Ashvini bhave shared photo with actor ajinkya deo and said once again after 25 years  sakal
मनोरंजन

Ashvini bhave: काहीतरी नवं येतंय! अश्विनी भावे-अजिंक्य देव 25 वर्षांनी एकत्र..

या आधी दोघांनी 'सरकारनामा' या चित्रपटात एकत्र काम केले होते, आज अश्विनी भावेने त्या आठवणींना उजाळा दिला आहे.

नीलेश अडसूळ

ashvini bhave and ajinkya deo: अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. गेली २ दशके त्या चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी केलेल्या सर्वच भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. फक्त मराठीतच नाही तर त्यांच्या कलाकृतीने बॉलीवूड मध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडच्या बड्या बड्या स्टार्ससोबत त्यांनी काम केलं आहे. फक्त फॅन्सच नाहीतर चित्रपट समीक्षकांनाही त्यांच्या कामाची नेहमीच तारीफ केली आहे. आज अश्विनी भावे यांनी अजिंक्य देव यांच्यासोबत फोटो शेयर करत खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी एके काळी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 'सरकारनामा', 'धाकडेबाज', 'बनवाबनवी', 'हळद रुसली, कुंकू हसलं', वजीर असे अनेक चित्रपट त्यांनी हिट केले आहे. अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबतचा 'सरकारन नामा' हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटाला जवळपास २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता २५ वर्षांनी अश्विनी आणि अजिंक्य पुन्हा एकत्र येत आहे.

अश्विनी भावे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अश्विनी आणि अजिंक्य एक देव एकत्र आहेत. या शूटिंग लोकेशनवर. या फोटोला कॅप्शन देताना अश्विनी म्हणाल्या, 'सरकारनामा' या चित्रपटाचे रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करत आहोत. अशातच मी आणि अजिंक्य आम्ही एकत्र पुन्हा चित्रीकरण करत आहोत, तेही २५ वर्षांनी..' त्यांच्या या पोस्टने चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. आता नवीन काय पाहायला मिळणार याचे वेध चाहत्यांना लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT