ashwini 
मनोरंजन

अश्विनी भावे यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत सेलिब्रेट केला वाढदिवस!

सकाळवृत्तसेवा

सेलिब्रिटींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी बऱ्याचदा दिवाळी-दसऱ्यासारखाच असतो. बॉलीवूड सेलेब्सच्या वढदिवसाला त्यांच्या घराबाहेरची गर्दीही आता आपल्याला नित्याचीच झालेली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिनेत्री अश्विनी भावे मात्र आपल्या  वाढदिवसाला मोठ-मोठ्या पार्टीज न करता, दरवर्षी वाढदिवस खूप साध्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने सेलिब्रेट करणंच पसंत करतात.

यंदाही त्यांनी आपल्या पती आणि मुलांसहच आपला वाढदिवस साजरा केला. अमेरिकेतून आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ”मला आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. माझी मुलगी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला केक बनवते. सॅनफ्रान्सिसकोच्या ‘बे एरिया’त आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स वास्तव्याला आहेत. आम्ही सगळे एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो. आणि या सगळ्यावर ‘टॉपिंग ऑफ दि केक’ सारखं असतं, सर्वात शेवटंच पण महत्वाचं म्हणजे, रात्री नवऱ्यासोबत डिनर डेटला जाणं.”

लहानपणीच्या आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबतच्या त्या आठवणी सांगताना हसून म्हणतात, “माझा वाढदिवस मे महिन्यात येत असल्याने त्यादिवशी घरी आमरस बनवायचा रिवाज होता. जो मला आवडायचा नाही. आणि मी खूप चिडायचे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT