Asin Thottumkal Reacted On Divorce News With Husband: Esakal
मनोरंजन

Asin Divorce Rumors: घटस्फोटाच्या बातम्या रंगल्या अन् असिनच्या पोस्टनं वेधलं लक्ष!

Vaishali Patil

Asin Thottumkal Reacted On Divorce News : साउथ फिल्म इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडला ही आपल्या अभिनयानं वेड लावणारी सुप्रसिद्ध असिन थोट्टूमकल ही अचानक चर्चेत आली. लग्नानंतर लाईमलाईटपासून दुर असलेली असिन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली.

असिन आणि तिचा पती राहुल शर्मामध्ये यांच्यात काहीतरी बिनसलं आहे. अशा बातम्याही समोर आल्या. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचा दावाही करण्यात आला. याला कारण होते की तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पतीसोबतचे लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्यानंतर या बातम्यांनी जोर पकडला. मात्र आता खुद्द असिनने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान असीननं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेयर केली. यातील स्टेटमेंटमध्ये असिनने लिहिले की, "आम्ही आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकत्र बसून नाश्ता करत होतो. याचवेळी आम्हाला अतिशय काल्पनिक आणि बिन बूडाची बातमी कळली.

या गोष्टींने मला आमच्या त्यावेळची आठवण करून दिली, जेव्हा आम्ही आमच्या घरी कुटुंबासोबत बसलो होतो आणि आमच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती मिडियावर आमच्या ब्रेकअपच्या बातम्या होत्या.

कृपया काहीतरी चांगलं काहीतरी करा. या सुंदर सुट्टीतील 5 मिनिटे वाया घालवल्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे."

असिन आणि राहुल शर्मा 19 जानेवारी 2016 रोजी लग्न केले. त्यांनी काही काळ एकमेंकाना डेट केले आणि नंतर लग्न बंधनात अडकले. 2017 मध्ये असिनने मुलगी अरिनला जन्म दिला.

Asin and Rahul Sharma

असिन आणि मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मा यांची पहिली भेट 2012 मध्ये झाली होती, जेव्हा ती 'हाऊसफुल 2' च्या शूटिंगसाठी ढाका येथे जात होती.

राहूल अक्षय कुमारचा मित्र त्याने त्यानेच दोघांची ओळख करुन दिली होती. लग्नानंतर ती चित्रपसृष्टीतुन लांब गेली.

तिने तिच्या कारकिर्दीत 'गजनी' 'रेडी', 'हाऊसफुल 2', 'बोल बच्चन' आणि 'खिलाडी 786' 'ऑल इज वेल' या चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT