Bharti Shahani yahoo and GoFundMe
मनोरंजन

म्युझिक फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; भारतीय वंशाची विद्यार्थिनी ब्रेन डेड

या धक्कादायक घटनेत आठ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

स्वाती वेमूल

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये Astroworld Festival tragedy अचानक मोठा गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक जण जखमी झाले. याच चेंगराचेंगरीत जखमी झालेली २२ वर्षीय भारती शहानी Bharti Shahani ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. भारती ही टेक्सास अॅग्रिकल्चरल अँड मेकॅनिकल युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास कॉन्सर्टमध्ये ही चेंगराचेंगरीची धक्कादायक घडना घडली होती. "मंचासमोरील गर्दी अचानक वाढली आणि त्या गर्दीत श्वास गुदमरून अनेकजण बेशुद्ध झाले. त्याच आठ जणांचा मृत्यू झाला", अशी माहिती ह्युस्टन फायर चीफ सॅम्युअल पी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बहीण नम्रता आणि चुलत भाऊ मोहित बेलानी यांच्यासोबत भारती या कॉन्सर्टला गेली होती. मंचासमोरील गर्दी वाढली तेव्हा त्यात तिघे हरवले. यामध्ये नम्रता आणि मोहित यांचा मोबाइल फोनसुद्धा हरवला. त्यामुळे ते भारतीला शोधू शकत नव्हते. या भयावह घटनेबद्दल मोहित 'एबीसी ह्युस्टन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "एका व्यक्तीवर अनेकजण तुटून पडत होते. जमिनीवर जणू लोकांचा खच जमा झाला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी, श्वास घेण्यासाठी आम्ही वर येण्याचा जीवापाड प्रयत्न करत होतो. भारतीला बराच वेळ श्वास घेता आलं नाही आणि त्यामुळेच मेंदुच्या नसा जवळपास ९० टक्के सुजल्या."

"भारतीचे प्राण वाचण्याची शक्यता नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. हे मी अद्याप माझ्या पत्नीला सांगितलं नाही. आम्ही तिच्यासाठी प्रार्थना करत आहोत. कदाचित प्रार्थनांमुळेच चमत्कार घडू शकेल", अशी प्रतिक्रिया भारतीचे वडील सनी शहानी यांनी दिली. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भारतीला तातडीने ह्युस्टन मेथडीस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेताना तिला हृदयविकाराचा झटकाही आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये मंचावर ट्रेविस स्कॉट परफॉर्म करत होता. त्यावेळी अचानक गर्दी मंचासमोर आली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. या कॉन्सर्टला सुमारे ५० हजारांची गर्दी जमली होती. ज्या ठिकाणी हा कॉन्सर्ट होता, त्याठिकाणी एवढे लोक जमण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT