Lara Dutta Social media
मनोरंजन

एका प्रश्नाने बदललं लारा दत्ताचं आयुष्य; पटकावला 'मिस युनिव्हर्स'चा किताब

गाजियाबादच्या लाराने संपूर्ण जगासमोर आपली प्रतिभा दाखवली आणि 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट आपल्या नावे केला.

स्वाती वेमूल

अभिनेत्री लारा दत्ताने २००० साली 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला. संपूर्ण भारतासाठी ही अभिमानास्पद बाब होती. फॅशन विश्वातील इतर मॉडेल्सना टक्कर देत भारताच्या लाराने हा विजय मिळवला होता. २१ वर्षांपूर्वी गाजियाबादच्या लाराने संपूर्ण जगासमोर आपली प्रतिभा दाखवली आणि 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट आपल्या नावे केला होता. मात्र तिथपर्यंतचा लाराचा प्रवास काही सोपा नव्हता. स्पर्धेच्या अंतिम फेरीत लाराला अत्यंत कठीण प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर तिने खूप विचारपूर्वक दिलं होतं आणि त्यामुळेच त्या उत्तराने परीक्षकांची मनं जिंकली होती.

तो प्रश्न कोणता होता?

'मिस युनिव्हर्स' या सौंदर्यस्पर्धेच्या वेळी सायप्रस याठिकाणी निदर्शनं करण्यात आली होती. या सौंदर्यस्पर्धेने महिलांचा अनादर केला असं त्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. याला अनुसरून लारा आणि तिच्या सहस्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आला होता. लारासोबत व्हेनेझुएलाची क्लाऊडिया मोरेनो आणि स्पेनची हेलेन लिंडेस अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. "सध्या मिस युनिव्हर्स ही स्पर्धा महिलांचा अनादर करत असल्याचं म्हणत बाहेर निदर्शनं सुरू आहेत. ते चुकीचं आहे हे त्यांना पटवून द्या", असा प्रश्न तिघींना विचारण्यात आला होता. त्यावर लाराने अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिलं. "मला वाटतं मिस युनिव्हर्ससारख्या स्पर्धा आम्हा तरुणींना पाहिजे त्या क्षेत्रात प्रगती करण्यास आणि पुढे जाण्यास उद्युक्त करतात. सैन्यदल असो, राजकारण असो किंवा मग एखादा व्यवसाय, ही स्पर्धा आम्हाला आमची मतं मांडण्यासाठी, आम्ही स्वावलंबी आहोत हे दाखवून देण्यासाठी आणि आम्हाला सक्षम बनवण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देते", असं उत्तर लाराने दिलं. तिच्या या उत्तराने परीक्षक प्रभावित झाले.

हेही वाचा : 'तू एवढी गचाळ का राहतेस'; महिलेच्या कमेंटवर भडकली हेमांगी कवी

ही स्पर्धा जिंकल्यानंतर लाराला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तिने 'अंदाज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत काम केलं होतं. प्रियांकानेही २००० साली 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने 'पार्टनर', 'डॉन', 'हाऊसफुल' आणि 'सिंग इज ब्लिंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम' या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये वाणी कपूर आणि हुमा कुरेशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT