Athiya-Rahul Wedding esakal
मनोरंजन

Athiya-Rahul Wedding : खंडाळ्यात होतंय अथिया-राहुलचं लग्न, पाहा कसं आहे शेट्टी अण्णाचं शानदार फार्महाऊस

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नाची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून सुरु

सकाळ डिजिटल टीम

Athiya-Rahul Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नाची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आज दोघेही एका इंटिमेट वेडिंग फंक्शनमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याच्या मंडप सजला आहे, वधू-वरांचीही सर्व तयारी झाली आहे.

अथिया आणि केएल राहुल हे खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्महाऊसवर विवाह बंधनात अडकतील. जाणून घेऊया या बंगल्याची वैशिष्ट्ये

सुनील शेट्टीच्या घराची नेत्रदीपक एन्ट्री

सुनील शेट्टी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर भगवान शंकराची भव्य मूर्ती ठेवण्यात आली आहे.घराच्या आजूबाजूला इतकी हिरवाई आहे की माणूस मंत्रमुग्ध होतो.

राहण्याचा सुंदर परिसर

सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्याची राहण्याची जागा मोठी आहे.घराचा प्रत्येक कोपरा सजावटीच्या वस्तूंनी सजलेला असतो.यासोबतच प्रत्येक कोपरा सुंदर करण्यासाठी इनडोअर प्लांट्सही लावण्यात आले आहेत.

सुनील शेट्टीच्या घराचे छत हे फार स्पेशल आहे

सुनील शेट्टीच्या घराचे छत अप्रतिम आहे.ते कारच्या सनरूफप्रमाणेच उघडते.घराच्या गच्चीवरून आजूबाजूचे दृश्य इतके सुंदर दिसते की इथून बाहेर पडावेसे वाटणार नाही.

सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्याचा टॉप अॅंगल

या फोटोमध्ये सुनील शेट्टीच्या बंगल्याचे सौंदर्य तुम्ही पाहू शकता.वरून त्याचे घर असे दिसते. दऱ्यांमध्ये वसलेला सुनील शेट्टीचा बंगला एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही.

बंगल्यात आहेत पुरातन वस्तू

सुनील शेट्टीच्या या बंगल्यात तुम्हाला अनेक प्रकारच्या प्राचीन वस्तू मिळतील.त्याच्या बंगल्यात असे अनेक कोपरे आहेत जिथे निवांत क्षण सहज घालवता येतात.सुनीलच्या बंगल्याचा हा कोपरा खूप सुंदर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT