atul todankar emotional post after thipkyanchi rangoli serial goes off air  SAKAL
मनोरंजन

"अगदी खरं आणि स्पष्ट सांगतो", ठिपक्यांची रांगोळी मालिका संपताना अतुल तोडणकरची पोस्ट चर्चेत

ठिपक्यांची रांगोळी मालिका संपल्यावर अतुल तोडणकर यांनी लिहीलेली पोस्ट चर्चेत आहे

Devendra Jadhav

Thipkyanchi Rangoli: स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या सेटवर काहीच दिवसांपुर्वी शुटींगचा शेवटचा दिवस सेलिब्रेट करण्यात आला. केक कापून खास सेलिब्रेशन करण्यात आलं.

अशातच मालिका संपल्यावर मालिकेतील सर्वांचा लाडका कुक्की म्हणजेच अभिनेता अतुल तोडणकरची खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला अतुल जाणुन घ्या.

अतुल तोडणकर यांनी मालिकेतील कलाकारांसोबत फोटो शेअर करुन लिहीलंय की, ठिपक्यांची रांगोळी हि मालिका लवकरच रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतेय. त्यानुसार मालिकेचं शूटिंगही संपलंय.. अगदी खरं आणि स्पष्ट सांगू... मी आमची मेकअप रूम खूप मिस करतोय. एकाच मेकअप रूममध्ये आम्ही ४ कलाकार एकत्र असायचो.. असं मी अजूनपर्यंत कधीच नाही केलंय पण इथे ते घडवून आणलं ते आमच्यामध्ये असलेलं भावनिक बंध अर्थात EMOTIONAL BONDING ने.

अतुल तोडणकर शेवटी लिहीतात, "एकमेकांकडून कसलीही अपेक्षा, फायदा घेण्याची वृत्ती, स्वार्थीपणा अशा कुठल्याही भावना नसताना ( जे हल्ली खूपच दुर्मिळ आहे )आम्ही चार बिंदू... हळूहळू चौकोन आणि हळूहळू वर्तुळ होत एकमेकांच्या कधी जवळ आलो आमचं आम्हालाच कळलं नाही.. मित्रांनो, हो आता सहकलाकार नाही,... मित्र.. तुम्हाला खूप मिस करतोय आणि करेन. पुन्हा एकत्र काम करण्याचा योग लवकरच येऊ दे.. मज्जा आली.. खूssssssप मज्जा आली.."

ठिपक्यांची रांगोळी मालिका संपल्यावर स्टार प्रवाहवर नवीन मालिका सुरु होत आहे. तिचं नाव लक्ष्मीच्या पावलांनी. २० नोव्हेंबरपासुन रात्री ९.३० वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT