Avdhoot Gupte  Esakal
मनोरंजन

Avdhoot Gupte: 'अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते?', अवधूतला हुप्प्या देतोय त्रास? व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Avdhoot Gupte: मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अवधूत गुप्ते. तो प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणुन अवधूत गुप्तेला ओळखलं जाते.

आपल्या अनोख्या व अप्रतिम गाण्यांमुळे सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा अवधूत सध्या झी मराठीवर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.

मात्र आता तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याला काहीजण त्रास देत आहेत. स्वत: अवधूतने याबाबत व्हिडिओ शेयर करत याची माहिती दिली आहे.

त्याचे झालं असं की, त्याच्या घरात काही 'बिन बुलाए मेहमान' आले आहेत. त्यांनी घराचा ताबा घेतला असून ते अवधूत आणि त्याच्या कुटूंबाला त्रास देत आहे. त्याच्या घरात एक माकड घुसून उच्छाद मांडताना दिसत आहे. अवधूत गुप्तेने त्याचा एक व्हिडिओ शेयर केला आणि त्यात लिहिलं की,

'अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते?

तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते!! व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा!

हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे.'

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! ..

आणि ह्याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!” ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात.

आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात.

माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या-दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. करोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!

बाकी स्ट्रगल चालूच राहील..

फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस!

आता अवधूतची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेक नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

Latest Marathi News Live Updates : महाबळेश्वरातील वेण्णा नदीचे पाणी रस्त्यावर, पाचगणीत सतत पावसाच्या धारा

'८७ रुपयांचा शाईचा पेन'ची रशियातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड; बालकलाकाराचा आनंद गगनात मावेना

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर महिनाभरात २.२४ लाख वाहनांची वर्दळ; एका महिन्यात २० कोटींचा महसूल

SCROLL FOR NEXT