Avdhoot Gupte 
मनोरंजन

Avdhoot Gupte in Politics: अवधूत गुप्तेची राजकारणात एन्ट्री? 'झेंडा'च्या सिक्वलबाबत मोठी घोषणा

अवधूतनं राजकारणात येण्याचे संकेत दिले असून 'झेंडा'च्या सिक्वलची कथा काय असेल हे देखील सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : प्रसिद्ध गायक, संगितकार, दिग्दर्शक, अभिनेता अवधूत गुप्ते राजकारणात पाऊल टाकणार आहे. एका मुलाखतीत त्यानं ही माहिती दिली. अवधूत आपल्या प्रोफेशनद्वारे राजकीय क्षेत्राच्या कायम जवळ राहिला आहे. त्याला राजकारणात येण्याबाबत विविध राजकीय पक्षांकडून अनेकदा विचारणाही झाली आहे. यापार्श्वभूमीवर आपल्या प्रत्यक्ष राजकारणातील प्रवेशावर तो स्पष्टच बोलला आहे.

अवधूत गुप्ते मराठीसह बॉलिवूडमध्येही पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानं मराठीत झेंडा हा महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करणारा एक सिनेमाची दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला मोठा प्रतिसाद लाभला होता. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांसाठी त्यानं थीमसाँग बनवले आहेत. त्यामुळं आपल्या कामामधून तो कायम राजकारणाच्या जवळच राहिला आहे.

दरम्यान, मुंबई टाईम्स कार्निव्हल या कार्यक्रमात अभिनेता पुष्कर श्रोत्री यानं अवधूत गुप्तेशी संवाद साधला. यावेळी अवधूतनं आपण राजकारणात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात येण्याची योग्य वेळ कुठली आहे हे देखील त्यांनं यावेळी सांगितलं. तो म्हणाला, "एखादी निवडणूक आली की मला अनेकदा राजकारणात येण्याबाबत विचारणा झाली आहे. पण आता मी खरंच जाहीर करुन टाकतो की मी राजकारणात प्रवेश करणार आहे. पण मी जेव्हा सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होईल तेव्हाच राजकारणात प्रवेश करेन. ज्यावेळी माझा पक्का निर्णय होईल तेव्हा मी राजकारणात येण्याची तारीखही जाहीर करेन"

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

'झेंडा'चा येणार सिक्वल

यापूर्वी शिवसेनेच्या फुटीवर अवधूतनं दिग्दर्शित केलेला झेंडा सिनेमाचा पुढचा भाग येईल का? या प्रश्नावरही त्यानं उत्तर दिलं आहे. झेंडा सिनेमात मी शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याची बाजू मांडली होती. पण आता नेत्यांची आगतिकता दाखवेन, याच्या स्क्रिप्टवर माझं काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT