Avinash Narkar Aishwarya Narkar Mazya Papani Ganpati : esakal
मनोरंजन

Avinash Narkar Video : 'सगळे करुन थकले अन् आता नारकरही म्हणताहेत, 'पप्पांनी गणपती आणला'! नेटकऱ्यांनी दिला भरभरुन आशिर्वाद

नारकर सेलिब्रेटींनी गेल्या काही दिवसांपासून जे व्हिडिओ किंवा रिल्स व्हायरल केले आहेत त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

Avinash Narkar Aishwarya Narkar Mazya Papani Ganpati : टीव्ही मालिका, नाटकं आणि चित्रपट क्षेत्रामध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख उमटविणाऱ्या अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांची ओळख मोठी आहे. त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यांच्या व्हिडिओला मिळणारी पसंतीही भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

नारकर सेलिब्रेटींनी गेल्या काही दिवसांपासून जे व्हिडिओ किंवा रिल्स व्हायरल केले आहेत त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता त्यावर नेटकऱ्यांनी सणकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी आता तर अविनाश नारकर यांना, नारकर अहो आता बस्स करा, तुमचे ते तेच तेच ते एक्सप्रेशनवाले व्हिडिओ पाहून कंटाळा आला. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना देखील नेटकऱ्यांनी वेगवेगळया प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या पप्पांनी गणपती आणला या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे दिसून आले होते. त्यात एका शाळकरी मुलानं ज्या सुंदर एक्सप्रेशनं ते गाणं म्हटलं त्यावर नेटकऱ्यांना कमालीचे आवडले. लाखो नेटकऱ्यांनी त्या चिमुकल्याचे कौतुकही केले. मात्र आता त्या मोठ्या व्यक्तींनाही त्या व्हिडिओनं वेडं केल्याचे दिसून आले आहे.

त्यातच मराठी मनोरंजन विश्वातील काही सेलिब्रेटींनी त्यावर रिल्स तयार करण्यास सुरुवात केली आहे.त्यात अविनाश नारकर यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी त्या गाण्यावर डान्स करत जे एक्सप्रेशन्स दिले आहे. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सवरुन त्यांच्यावर आगपाखड करण्यात आली आहे हे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT