Avneent Kaur Agu Stanley Instagram video Viral Tiku  esakal
मनोरंजन

Avneent Kaur Agu Stanley : अवनीतला पाहिल्यावर अगुला स्वर्ग दोन बोटं उरला!

बॉलीवूडची रणरागिणी म्हणून जिची ओळख आहे त्या कंगनाच्या मणिकर्णिक प्रॉडक्शनचा टीकू वेड्स शेरु नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Avneent Kaur Agu Stanley : बॉलीवूडची रणरागिणी म्हणून जिची ओळख आहे त्या कंगनाच्या मणिकर्णिक प्रॉडक्शनचा टीकू वेड्स शेरु नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांचा बऱ्यापैकी प्रतिसादही मिळाला आहे. त्यात अवनीत कौर आणि नवाझुद्दीन सिद्धिकी यांच्या प्रमुख भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे.

टीकू वेड्स शेरु हा सोशल मीडियावर अनेकांच्या रागाचा विषय ठरला आहे. हा एक रटाळ आणि कंटाळवाणा चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाला जे रेटिंग मिळाले आहे ते दोन पेक्षा जास्त नाही. यावरुन टीकू वेडस् शेरुचा दर्जा कळून येतो. निर्मात्या क्षेत्रात उतरलेल्या कंगनाला या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र तिची निराशा झाली आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

आता या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री अवनीत आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा अगु स्टॅनले यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. अगु हा इंस्टाग्रामवर कंटेट क्रिएटर म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचा अवनीत सोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी अवनीतची थट्टा उडवली आहे. हा अगु तुझ्यासोबत काय करतोय, अगुला तू पसंत आहे की काय, आता अगू तुझ्या चित्रपटाचे प्रमोशन करतो आहे की काय, अशा प्रकारचे प्रश्न नेटकऱ्यांनी अवनीतला विचारला आहे.

नवाझुद्दीन आणि अवनीत यांनी त्यांच्या या चित्रपटाचे प्रमोशन खूप जोरदार केले होते. वेगवेगळ्या मुलाखतीतून त्यांनी नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना आवाहनही केले होते. मात्र चित्रपटाची कथा, संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन हे कमकुवत असल्यानं त्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यासगळ्यात अवनीतचा प्रमोशनचा वेगळा फंडा आहे की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT