Ayodhya Ram Mandir Consecration Vivek Agnihotri 
मनोरंजन

Ram Mandir Consecration : 'देवाला माहिती आहे की ...' निमंत्रण असूनही विवेक अग्निहोत्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही!

या सगळ्यात सध्या विवेक अग्निहोत्री यांच्या एक्स वरील पोस्टची चर्चा सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे

Ayodhya Ram Mandir Consecration Vivek Agnihotri : द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच ओळखले जातात. ज्वलंत (Ram Mandir Latest Marathi News) विषयांवर चित्रपट तयार करणे आणि त्यावरुन कितीही वाद झाला तरी आपल्या भूमिकेवर ठाम राहणे या कारणास्तव अग्निहोत्री चर्चेचा विषय राहिले आहेत.

उद्या अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्धघाटन आणि त्या नवमंदिरात प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir Inauguration) मोठा सोहळा आयोजित केला आहे. त्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींना निमंत्रण देण्यात आले आहे.त्यात मनोरंजन क्षेत्राविषयी बोलायचे झाल्यास बिग बी अमिताभ बच्चन, थलायवा रजनीकांत, कंगना रनौत, चिरंजीवी, (Bollywood latest updates) रणदीप हुडा, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर या मान्यवरांचा समावेश आहे.

या सगळ्यात सध्या विवेक अग्निहोत्री यांच्या एक्स वरील पोस्टची चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला राम मंदिराच्या या भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. असे म्हटले आहे. केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून देखील विविध मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातून अनेकदा निमंत्रणाचे फोन आले. याशिवाय खास निमंत्रण पत्रिकाही आली. पासही उपलब्ध झाले. मात्र या सोहळ्याला मला उपस्थित राहणे शक्य होणार नाही.याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी मला बाहेरच्या देशात तातडीनं कामानिमित्तानं जायचे आहे.

अयोध्येतील सोहळ्यासाठी ज्या प्रकारे तयारी करण्यात आली आहे त्याचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. २२ जानेवारी रोजी मी भारताबाहेर आहे. त्यामुळे मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. प्रभु श्रीराम यांना माहिती आहे की, मी किती दु:खी आहे ते...अशा शब्दांत अग्निहोत्री यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अग्निहोत्री यांची द व्हॅक्सीन वॉर नावाची फिल्म गेल्या वर्षी दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. त्यात नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका होती. त्याला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. येत्या काळात त्यांचा पर्व नावाचा चित्रपट चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

Beed Crime: बीडच्या कारागृहात ठाराविक कैद्यांचे लाड! खासदार सोनवणे अमित शाहांच्या भेटीला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT