ayodhya ram mandir inauguration asha bhodle usha mangeshkar invited  SAKAL
मनोरंजन

Ayodhya Ram Mandir: मंगेशकर कुटुंबाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण, आशा - उषा होणार सहभागी

अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी मंगेशकर कुटुंबाला आमंत्रण मिळालंय

Devendra Jadhav

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या राम मंदिर सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. भारतातील प्रत्येक नागरिक २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सध्या अनेक व्यावयायिक आणि कलाकारांना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळत आहे. अशातच आपल्या सुरेल गायनाने गेली अनेक दशकं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळालंय.

अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी आशा भोसले - उषा मंगेशकर यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळालंय. त्यामुळे आशा - उषा मंगेशकर सुद्धा २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यासाठी सहभागी होणार आहेत.

मंगेशकर कुटुंबासोबतच अक्षय कुमार, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रणदीप हुडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अयोध्येतील राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.

हे कलाकार होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची पूजा करणार आहेत. याशिवाय भारतीय चित्रपट, क्रीडा जगत आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत, मनमोहन सिंग, धनुष, मोहनलाल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, प्रभास आणि यश यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.

याशिवाय मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी आणि टीएस कल्याणरामन यांसारखे उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योगपतीही या कार्यक्रमाचा भाग असतील. हा कार्यक्रम सांस्कृतिक, चित्रपट आणि व्यावसायिक दिग्गजांचा संगम असेल.

23 जानेवारीपासून सर्वसामान्यांना दर्शन मिळणार आहे

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले होणार आहे. "प्राण प्रतिष्ठा' दुपारी 1 वाजेपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी आणि इतर उपस्थित आपले मनोगत व्यक्त करतील. परंपरेनुसार नेपाळच्या जनकपूर आणि मिथिला भागातून 1000 टोपल्यांमध्ये भेटवस्तू दाखल झाल्या आहेत. 20 आणि 21 जानेवारीला दर्शन जनतेसाठी बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT