Ayushman Khurana Instagram
मनोरंजन

Ayushman Khurana: 'हे ट्वीटर आहे तुझी खासगी डायरी नाही', 'ती' शायरी शेअर केल्याने आयुष्मान ट्रोल

आयुष्मान त्याच्या खास अंदाजातील शायरी ट्वीटरवर कायम शेअर करतो पण त्याच्या नुकत्याच पोस्ट केलेल्या एका शायरीवर मात्र लोकांचा राग राग झाला आहे.

प्रणाली मोरे

Ayushman Khurana: अभिनेता आयुष्मान खुराना सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. कधी कुटुंबियांसोबतचे फोटो तर कधी सिनेमाचं प्रमोशन तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. यासोबतच आयुष्मान त्याच्या खास अंदाजातील शायरी ट्वीटरवर कायम शेअर करतो .

आयुष्मानच्या शायरी नेटकऱ्यांच्या देखील पसंती पडतात. मात्र नुकत्याच शेअर केलेल्या शायरीमुळे आयुष्मानला ट्रोल करण्यात आलं आहे. ट्वीटर म्हणजे तुझी खासगी डायरी नव्हे असं म्हणत एका नेटकऱ्याने आयुष्मानला ट्रोल केलं.

अर्थात या ट्रोलरला आयुष्मानने पुन्हा एकदा त्याच्या मिश्कील अंदाजात उत्तर दिलं आहे.

सोमवारी आयुष्मानने ट्वीटरवर एक शायरी पोस्ट केली. 'कभी मेरी अदा पे हुई दीवानी, कभी लगी उसे मेरे जिस्म की लत और जब हुई तो हुई आयुष्मान उसे मेरे बचपन से मोहब्बत.'

या शायरीसोबत त्याने इंग्रजीमध्ये या शायरीचा सारांशही लिहिला. ज्यात त्याने लिहिलं, ''एखादी स्त्री तुमच्या शरीराकडे पाहून किंवा तुम्ही कसे पुरुष आहात हे पाहून तुमच्याकडे आकर्षित होवू शकते. मात्र प्रेमात पडताना ती तुमच्यात दडलेल्या लहान मुलाच्या प्रेमात पडते''.

हेही वाचा: भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

या शायरीवर एका युजरने एका शायरीच्या माध्यमातूनच प्रतिक्रिया दिली. 'दिल में जो हर बात आए वो शायरी नहीं, ये ट्विटर है आयुष्मान, आपकी पर्सनल डायरी नहीं'असं या युजरने लिहिलं आहे.

या युजरला आयुष्मानने पुन्हा एकदा त्याच्या शायरीनेच उत्तर दिलं आहे. 'मेरी शायरी कभी तुकबंदी तो कभी मेटर में है, जो मजा पर्सनल डायरी में नहीं वो ट्विटर में है.'आयुष्मानने युजरला शायरीच्या माध्यमाने दिलेलं हे उत्तर त्याच्या चाहत्यांना आवडलं आहे.

अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. तर काही चाहत्यांनी शायरी शेअर करतच आयुष्मानची पाठ थोपटली आहे.

'एक्शन हिरो' या सिनेमानंतर सध्या आयुष्मान 'ड्रीम गर्ल २' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तो अभिनेत्री विद्या बालनसोबत झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT