Ayushmann Khurrana father 
मनोरंजन

Ayushmann Khurrana father : आयुष्यमान खुराणावर काळाचा आघात, वडिलांचे निधन

आयुषमानच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Actor Ayushmann Khurrana’s father, P Khurrana passes away : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे ओळखला जातो. कमी काळात मोठी लोकप्रियता मिळवणारा अभिनेता म्हणून त्याचे नाव घ्यावे लागेल. अशा या प्रतिभावान अभिनेत्यावर काळानं मोठा घाला घातला आहे.

आयुषमानच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषमानच्या वडिलांचे पी.खुराणा यांचे निधन झाले आहे. मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. (सविस्तर बातमी थोड्याच वेळात)

आयुषमानच्या संबंधित ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी त्यावर पोस्ट करुन त्याच्या वडिलांनी आदरांजली वाहिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून आयुषमानचे वडील हे हदयविकारानं त्रस्त होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या वडिलांच्या निधनानं चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

खुराणा कुटूंबियांकडून यासंबंधी एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. त्यात, आमचे वडील पी खुराणा (विरेंद्र खुराणा) आमच्या कुटूंबाचे आधारस्तंभ हे आज आपल्यात नाही. त्यांचे जाणे हे आमच्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मणिमांजरा मैदानावर पी खुराणा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT