Ayushmann Khurrana
Ayushmann Khurrana Google
मनोरंजन

'ट्रान्सजेंडर'ना माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे,याचं कारण मी ...

प्रणाली मोरे

आयुषमान खुराना(Ayushmann Khurrana) हा बॉलीवूडला मिळालेला एक असा अभिनेता आहे जो प्रेक्षकांना असलेली वेगळ्या विषयांची आणि नैसर्गिक अभिनयाची भूक सहज भागवून जातो. त्यानं आतापर्यंत केलेले त्याचे सिनेमे पाहिले तर अगदी 'स्पम डोनर'च्या व्यक्तिरेखेपासून ते 'गे' व्यक्तिरेखा साकारण्याचं धाडस करणारा तो बॉलीवूडमधला पहिलाच अभिनेता असावा. ज्या विषयांवर समाजात उघडपणे बोलण्याचं लोक टाळतात त्याच विषयांवर आधारित सिनेमात काम करण्याचं धाडस करणाराही बहुधा तो एकमेव. त्याच्या सिनेमात कधीही कुठल्या गाण्यांची,धडाकेबाज मारामारीची किंवा किचन पॉलिटिक्सच्या मसाल्याची फारशी गरजच लागत नाही. कारण त्याच्या सिनेमाची कथा आणि आयुषमानचा सहज अभिनयच सिनेमाला तारायला पुरेसे ठरतात.

आयुषमान खुरानाचा सध्या 'चंदिगढ करे आशिकी' हा सिनेमा आपल्या भेटीस आलाय. या सिनेमात त्याच्यासोबत वाणी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक कपूरनं केलंय. आता आयुषमानचा सिनेमा आहे म्हटल्यावर सिनेमाचं कथानक हटके असणार,समाजमनाच्या एखाद्या विषयाचा मागोवा घेणारं असणार यात शंकाच नाही. 'चंदिगढ करे आशिकी' या सिनेमात वाणी कपूरनं 'ट्रान्सवूमन'ची व्यक्तीरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमाननं 'ट्रान्सजेंडर' हा शब्द आपल्या फार जवळचा आहे असं म्हटलं आहे. त्यानं त्यासंदर्भात बोलताना आपल्या वयाच्या तेराव्या वर्षी आलेला अनुभव मुलाखतीत शेअर केला.

Ayushmann Khurrana & Vani Kapoor In Chandigarh Kare Aashiqui

तो म्हणाला,''मी तेव्हा तेरा वर्षांचा होतो. जवळच्या हॉस्टेलमध्ये शिकणा-या दोन मुली माझ्या वडीलांकडे एकदा मदतीसाठी आल्या. त्यातल्या एकीला तिचं लिंग बदलण्याचं ऑपरेशन करायचं होतं. तिला पुरुष बनायचं होतं. कारण तिचं आकर्षण मुलींकडे आहे हे कळले होते. आणि तिला तिच्या त्या मैत्रिणीशी लग्न करायचं होतं. त्यासाठी तिनं हा ऑपरेशनचा पर्याय निवडला होता. त्यासाठी त्यांना मदत हवी होती. माझ्या वडिलांनी तिला त्यांच्या ओळखीच्या स्त्री रोग तज्ञाकडे पाठवलं. पण त्या डॉक्टरांनी त्या मुलीला 'निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करू नकोस' असा सल्ला दिला. शेवटी माझ्या वडिलांनी त्यांना मोठ्या शहरात जाण्याचा सल्ला दिला. ती मुलगी पुढे मुंबईत आली,तिनं आपलं ऑपरेशन करून घेतलं आणि तिनं नंतर तिच्या मैत्रिणीशीच लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला जवळपास २२ ते २५ वर्ष झाली आणि ते सुखाने संसार करत आहेत. मी ट्रान्सजेंडरना समाजात मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक जवळून पाहिलीय. त्यांचा त्रास मी अनुभवलाय. त्यामुळे अशा एखाद्या विषयावर मी काम करीत असलेला सिनेमा आहे त्याचा मला आनंद आहे''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT