tahira kashyap 
मनोरंजन

फाटक्या जीन्सचं उत्तर बिकिनीने; आयुषमानच्या पत्नीचा फोटो व्हायरल

स्वाती वेमूल

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांवरून केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. "फाटकी जीन्स परिधान करणाऱ्या महिला या मुलांना काय संस्कार देतील", असं विधान त्यांनी केलं होतं. यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. आता अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी आणि लेखिका ताहिरा कश्यप हिनेसुद्धा या वादात उडी घेतली आहे. ताहिराने सोशल मीडियावर तिचा एक जुना फोटो पोस्ट करत फाटक्या जीन्सच्या वक्तव्याला तिच्या अंदाजात उत्तर दिलंय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर तिने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचा खूपच आवडल्याचं दिसून येतंय. 

बिकिनी परिधान केलेला ताहिराचा हा जुना फोटो आहे. ताहिराने कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली असून उपचारानंतरचा तिचा हा फोटो आहे. 'कमीत कमी मी फाटकी जीन्स तरी नाही घातली', असा उपहासात्मक टोला तिने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना लगावला. तिच्या या फोटोला दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी हात जोडलेला इमोजी पोस्ट केला. ताहिरा अनेक मुद्द्यांवर बेधडकपणे तिची मतं मांडते. याआधीही ती विविध मुद्द्यांवर सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. 

वादानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलं नमतं
फाटक्या जीन्सवरील वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याने रावत यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माघार घेतली आहे. "कोणाचाही अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. महिलांचा सन्मान माझ्यासाठी नेहमीच सर्वांत महत्त्वाचा आहे", असं ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT