Dream Girl 2 Box Office Collection Day 7:  Esakal
मनोरंजन

Dream Girl 2 Box Office: ड्रिम गर्लच्या मोहिनी पुढे बाकी सर्व फिकचं! आयुष्मानच्या सिनेमानं सात दिवसात कमावले इतके कोटी...

ड्रीम गर्ल 2 रिलीज होऊन फक्त 7 दिवस असले तरी हा सिनेमा या विकेंडच्या शेवटापुर्वीच 100 कोटी क्लबमध्येही प्रवेश करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Vaishali Patil

Dream Girl 2 Box Office Collection Day 7: आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज झाल्यानंतर तर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल आणखीणच उत्सूकता वाढली होती. मात्र बॉलिवूडमध्ये गदर 2 आणि OMG 2 या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर ठाण मांडलेले होते त्यामुळे ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करु शकेल की नाही याबाबत अनेकांना शंका होत्या.

मात्र आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा 25 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला आणि या सिनेमाने तुफान कमाई करण्यास सुरुवात केली. आता या सिनेमाला रिलिज होऊन सात दिवस पुर्ण झाले आहेत. त्यात आता विकेंडला या चित्रपटाने तुफान कमाई करत बजेटच्या वर गल्ला जमवला आहे.

ड्रीम गर्ल 2 रिलीज होऊन फक्त 7 दिवस असले तरी हा सिनेमा या विकेंडच्या शेवटापुर्वीच 100 कोटी क्लबमध्येही प्रवेश करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

ड्रीम गर्ल 2' ने या आठवड्याच्या सुरुवातीलाही चांगले कलेक्शन केले आहे. बुधवारी 7.5 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या 'ड्रीम गर्ल 2'च्या रिलीजच्या 7व्या दिवशी 'गुरुवारी भारतात 8 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. या आकडेवारीनुसार 'ड्रीम गर्ल 2'ची 7 दिवसांची एकूण कमाई आता 67.50 कोटींवर पोहोचली आहे.

आयुष्मान खुराना स्टारर ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 2019 च्या हिट चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. या चित्रपटात 'ड्रीम गर्ल 2' मधील कलाकारांबद्दल बोलायचं झाल्यास यात आयुष्मान खुराना व्यतिरिक्त अनन्या पांडे, अन्नू कपूर, परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, असरानी, ​​मनोज जोशी आणि सीमा पाहवा यांनी दमादार भुमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT