Super Human Weapon Teaser:  Esakal
मनोरंजन

Super Human Weapon Teaser: 'बाहुबली'ला मारणारा 'कटप्पा' इज बॅक! सुपर ह्युमनचा टिझर रिलिज...

कटप्पा म्हणजेच सत्यराज हे आता एका सुपर ह्यूमन वेपनच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Vaishali Patil

Upcoming South Movie : साउथचा ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबली याने अनेक रेकॉर्ड तयार केले. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने खुपच धुमाकूळ घातला. तर दुसरा भाग प्रेक्षकांनी फक्त एका कारणासाठीच पाहिला. पहिला भाग पाहिल्यानंतर एकच प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. तो म्हणजे कटप्पाने बाहूबलीला का मारलं? दुसऱ्या भागात जितकी चर्चा बाहूबलीची झाली त्यापेक्षा जास्त चर्चा ही त्याचं संरक्षक करणाऱ्या कटप्पाची झाली.

आता त्याचच कटप्पा म्हणजेच सत्यराज हे पुन्हा एक धमाकेदार चित्रपटासोबत परतले आहेत. 'बाहुबली 2' च्या कट्टप्पाने पुन्हा बॉक्स ऑफिसवर एका नव्या युद्धाचा बिगुल वाजवला आहे. कटप्पा म्हणजेच सत्यराज हे आता एका सुपर ह्यूमन वेपनच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला. या खतरनाक टिझरमध्ये सत्यराजसोबत वसंत रवी, तान्या होप, राजीव मेनन आणि राजीव पिल्लई मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुपर ह्युमन वेपनचे दिग्दर्शन गुहान सेनिअप्पन यांनी केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती मिलियन स्टुडिओने केली आहे.
सत्यराज चित्रपटात खतरनाक खलनयाकाच्या भुमिकेत दिसत आहे. कटप्पा पुन्हा अॅक्शन अतवतारात परतले आहेत.

बाहुबलीनंतर पहिल्यांदाच सत्यराज मीडियाला भेटण्यासाठी मुंबईत आले आहे. सुपर ह्युमन वेपन हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी चित्रपटात काम करतानाचे अनुभव शेअर केले. सत्यराज यांना मुंबईत पाहिल्यानंतर ते पुन्हा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार का अशा चर्चा रंगल्या होत्या.

त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी पहिल्यांदाच रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये दीपिका पदुकोणच्या वडिलांची भुमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast : दिल्लीतील न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; लाल किल्ला स्फोटानंतर राजधानीत पुन्हा खळबळ

Mumbai News: धक्कादायक! मुंबईत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर शिव्या अन् आक्षेपार्ह भाषा, चाललंय काय?

Viral Video Omkar Elephant : कांताराचं रुप असलेला ओंकार हत्ती वनतारात जाणार, 'या' निर्णयाने कोकणी रानमाणूस चिडून म्हणाला...

Latest Marathi Breaking News : छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, ६ नक्षलवादी ठार

मुश्रीफ-घाटगेंची युती अनपेक्षित नाही, दोघांनी लोकसभेला मला फसवलंय; संजय मंडलिक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT