baaplyok marathi movie on ott release amazon prime video SAKAL
मनोरंजन

Baaplyok Movie: प्रेक्षक - समीक्षकांनी नावाजलेला 'बापल्योक' पाहा घरबसल्या! या ओटीटीवर रिलीज

शशांक शेंडेंचा गाजलेला 'बापल्योक' सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Baaplyok Movie News: आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने हे दोन मातब्बर दिग्दर्शक. ‘बापल्योक’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मकरंद माने यांच्या साथीला लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे प्रस्तुकर्ते म्हणून उभे राहिले.

प्रेक्षक - समीक्षकांनी नावाजलेला ‘बापल्योक’ ज्यांना पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय.

‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ वर आला आहे. ‘बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे.

नावाजलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'संत तुकाराम' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा तसेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण?

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आंध्रप्रदेश तिरुपती, आपला बायोस्कोप, सिंधुरत्न पुरस्कार अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये 'बापल्योक'चा गौरव करण्यात आला.

वडिल मुलाच्या नात्याचे मर्म सांगणारा आणि ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेला 'बापल्योक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’ वर पहायला मिळणार आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’ वर ‘बापल्योक’ रिलीज होणं ही आमच्यासाठीसुद्धा आनंददायी बाब आहे. मोठया पडद्यावर चित्रपटाला जो चांगला प्रतिसाद मिळाला तोच प्रतिसाद अॅमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही मिळेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT