baba ka dhaba owner kanta prasad alligations actor R madhavan tweet 
मनोरंजन

'बाबा का ढाबा' चा बाबा डेंजरच : आर.माधवन म्हणाला, 'खरंखोटं पाहावं'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोशल मीडियावर बाबा का ढाबा आणि तो ढाबा चालवणारा प्रचंड लोकप्रिय झाले. त्याला अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला. यामुळे कोरोनाच्या काळात त्याच्या ढाब्याची रुतलेली गाडी पुन्हा रुळावर आली आहे. बाबाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला. कित्येकांनी त्यांचे कौतूकही केलं. मात्र बाबाने आपल्याला मदत करणा-याच्या विरोधातच तक्रार केली. यामुळे ते चर्चेत आले आहे. यासगळ्यात अभिनेता आर माधवन या अभिनेत्याने बाबाच्या अशा प्रकारच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली असून गौरव वासनच्या भूमिकचे समर्थन केले आहे.

बाबा का ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी फूड ब्लॉगर गौरव वासन याच्यावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. आणि पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. यामुळे कांता प्रसाद यांच्यावर सोशल मीडियातून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. यावर अभिनेता आर माधवन याने कांता प्रसाद यांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, गौरवमुळे कांता प्रसाद यांना ओळख मिळाली होती. त्याच्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतही मिळाली. विशेष म्हणजे 80 वर्षीय कांता प्रसाद यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

माधवन म्हणाला, एखाद्या वृध्द व्यक्तीला मदत करुन गौरवने एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्यासाठी त्याचे कौतूक करायला हवे. कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपामुळे आणि गौरवच्या समर्थनार्थ व्टिट केलेल्या माधवनवर मोठ्या प्रमाणात उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. माधवन म्हणतो. कांता प्रसाद याच्यावर करण्यात आलेले आरोप जर चूकीचे असतील तर त्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. यासगळ्या प्रकरणात कोण चूक आणि कोण बरोबर हे पाहावे लागेल. अशाप्रकारे एखाद्याला मदत करुनही जर संबंधित व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार केल्यास समाजात वेगळ्या प्रकारचा संदेश पसरायला वेळ लागत नाही. आपल्या सर्वांना चांगल्या कामासाठी योगदान द्यायचे आहे.

गौरवने काही दिवसांपूर्वी बाबा का ढाबाच्या कांता प्रसाद यांच्यावर एक व्हीडिओ शेयर केला होता. त्याला सोशल मीडियावर नेटक-यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.  त्या व्हिडिओमध्ये प्रसाद यांनी त्यांचा संघर्ष तसेच कोरोनामुळे कमी झालेले ग्राहकसंख्या यामुळे काहीच कमाई होत नसल्याचे सांगितला होता. यानंतर नेटकऱ्यांनी याला मोठ्या प्रमाणात पसरवत बाबा का ढाबा मोठा प्रसिध्द केला होता.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव वासन याने केलेल्या प्रसाद यांच्या शेअर व्हिडिओत त्याने प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्या पैसे पाठवण्यासाठी गौरवने त्याचे जवळच्या व्यक्तींचे बॅंक डिटेल्स दिले होते, ज्यावर मदत म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवण्यात आले आहेत. तक्रारीत प्रसाद यांनी गौरवने अनेक पैशांचे व्यवहार परस्पर केले आणि ते लपविले असाही आरोप केला आहे.
 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT