rangabhoomi puraskar baba parsekar nirmala gogate esakal news
rangabhoomi puraskar baba parsekar nirmala gogate esakal news 
मनोरंजन

रंगभूमी जीवनगौरव बाबा पार्सेकर व निर्मला गोगटे 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई:  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव  रस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार  बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती निर्मला गोगटे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. रु.५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव  नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर तसेच श्रीमती फैय्याज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, श्रीमती निर्मिती सावंत, अरुण नलावडे,  राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत.

बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तिन्ही धारांमध्ये बाबांनी लखलखीत कामगिरी केली आहे. जे.जे.कला महाविद्यालयातून आर्टची पदवी घेणाऱ्या बाबा पार्सेकरांना पहिलेच गुरु भेटले ते प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे. त्यांच्याबरोबर राहून बाबा भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांना नेपथ्य करु लागले. विजया मेहता या दुसऱ्या गुरु तिथे त्यांना लाभल्या. ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या सागर माझा प्राण या नाटकाचे वैशिष्टयपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आजवर ४८५ नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले आहे.

श्रीमती निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णराव चोणकर, प्रो.बी.आर. देवधर यांचेकडून आवाज साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. सुरुवातीच्या काळात महिला कलासंगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या. साहित्य संघ मंदिर, मुंबई या संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मा. दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर यांसारख्या नामवंत कलाकारांसमवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशात आकाशवाणी व दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत.
या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार येत्या २० नोव्हेंबर २०१७ रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे,  रामकृष्ण नायक आणि लीलाधर कांबळी यांना प्रदान करण्यात आला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी श्रीमती फैय्याज,  प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर,रामदास कामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी आणि चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT