मनोरंजन

रामदेवबाबा संन्यास घेण्यामागचं कारण माहितीये का? जाणून घ्या त्यांच्याकडून..

शर्वरी जोशी

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे इंडियन आयडॉल. सध्या या शोचं १२ वं पर्व सुरु असून आतापर्यंत या मंचावर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अलिकडेच झालेल्या भागात योगगुरू रामदेव बाबा यांनी या शोच्या मंचावर हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या शोमध्ये त्यांनी त्यांच्या आध्यात्म  आणि संन्यास घेण्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. या भागाचा एक प्रोमो सध्या चर्चेत आला आहे. 

"२७ वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी मी माझं जीवन साधेपणाने जगण्याचा आणि सुखसुविधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. रामनवमीच्या दिवशी एकप्रकारे माझा नव्याने जन्म झाला. या दिवसापासून मी साधे आणि सात्विक जीवन जगू लागलो", असं रामदेव बाबा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "या मंचावर गाणी सादर करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे. या सगळ्याचे आवाज इतके सुमधूर आहेत, जे ऐकून माज्या अंगावर शहारे आले."

दरम्यान, आतापर्यंत या मंचावर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेखा, नीतू सिंग अशा लोकप्रिय अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 98.35 टीएमसी पाणीसाठा; 2 ते 3 दिवसांत धरण 100 टीएमसी भरण्याची शक्यता, धरणाचे दरवाजे 1 फुटावर...

Pune Kondhwa Ganja Raid : कोंढव्यात गांजा विक्रीवर पोलिसांचा मोठा छापा; २ विक्रेत्यांसह ४३ ग्राहक ताब्यात, २.५ किलो गांजा जप्त

मी पाहिलं माझ्या डोळ्यांच्या थ्रू...! मुंबई पोलिसांची Gen Z स्टाईल; नाना पाटेकर यांच्या 'क्रांतिवीर' गाण्याच्या ओळीतून केलं आवाहन

Latest Marathi News Live Update : वाकडमध्ये स्कूल व्हॅनला भीषण आग

Eknath Shinde: शिंदे गटाला धक्का! खोपोलीतील बड्या नेत्याचे पद रद्द, पडताळणीत जात प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT