Irrfan Khan,Babil Khan Google
मनोरंजन

बापाविना स्ट्रगल करणा-या मुलाला 'भोजपुरीत जा' म्हणून हिणवले...

दिवंगत इरफान खानचा मुलगा बाबिल खानला बॉलीवूडमधनं जाण्याचा सल्ला

प्रणाली मोरे

अभिनेता इरफान खान(Irrfan Khan) म्हणजे बॉलीवूडला मिळालेलं एक मौल्यवान रत्त. साधारण चेह-याच्या इरफाननं आपल्या अभिनयानं भल्या भल्यांना थक्क करून सोडलं होतं. सुरुवातीच्या सिनेमातनं गर्दीत दिसणा-या इरफाननं हळूहळू ७० एम.एमचा पडदा कधी व्यापून टाकला हे कळलं देखील नाही. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधनं सुरू झालेला त्याचा अभिनयाचा प्रवास फक्त बॉलीवूडच नाही तर थेट हॉलीवूडपर्यंत जाऊन पोहोचला. त्याने केलेल्या सिनेमाचा प्राण ही त्या सिनेमाची कथा असण्यासोबतच त्याचा अभिनयही असायचा. अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी गौरविलेल्या इरफानचा ऐनवेळी घात केला तो कॅन्सरसारख्या भयानक आजारपणाने. त्याला सिनेइंडस्ट्रीत लॉंग इनिंग खेळता आली नाही. साल २०२० मध्ये त्याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.

Babil Khan

पण आता इरफानचा मुलगा बाबिल खान सिनेइंडस्ट्रीत पदार्पणासाठी सज्ज झालाय. अनुष्का शर्मा निर्मित 'काली' या सिनेमात तो दिसणार आहे. बाबिलच्या चेह-यात इरफानची झलक दिसत असल्यामुळे त्याच्या अभिनयातही इरफानच्या अभिनयाचा दरारा असावा अशा अपेक्षा सध्या त्याच्याकडून केल्या जात आहेत. बाबिल खान त्याच्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो आपल्या कामासंदर्भातल्या अपेडट्ससोबतच त्याच्या वडिलांसोबतच्या आठवणी देखील सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. आपल्या फॅन्सच्या कमेंट्सना उत्तर देत असतो. नुकताच त्याने आपला एक सेल्फी काढलेला फोटो शेअर केलाय,ज्यावर लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. पण त्यातल्या एका कमेंट्सने बाबिल दुखावला असला तरी त्यानं फार मनावर नं घेता अत्यंत सफाईदारपणे समोरच्याला न दुखावता उत्तर दिलं

बाबिलने सोशल मीडियावर सेल्फी शेअर केलाय,जो त्याने कारमध्ये बसून काढला आहे. आणि त्याला कॅप्शन देत त्याने म्हटलंय,'जेव्हा तुमचे ओठ हत्तीइतके मोठे होतात'... आणि त्याचवेळेला त्याने एका कोल्डक्रीम कंपनीला विचारलंय,'माझा लीप बाम कुठे आहे?' पण त्याच्या या फोटोवर मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. कुणी म्हटलंय,'छान फोटो आहे'. तर कुणी म्हटलंय,'स्माइल प्लीज', कुणी विचारलंय,'तुझा नवीन सिनेमा कधी येतोय?'. पण एका ट्रोलरने मात्र बाबिलच्या जिव्हारी लागेल अशी कमेंट केलीय. त्याने त्याची खिल्ली उडवत म्हटलंय,'इतका सुंदर चेहरा आहे,तु भोजपुरी सिनेमात का नाही जात?' पण यावर न चिडता बाबिलने फक्त रडण्याचा इमोजी उत्तरादाखल पोस्ट केलाय.

बाबिलचा 'काली' सिनेमा लवकरच भेटीस येणार असून त्याने आणखी एक बॉलीवूड सिनेमा साइन केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT