Babil Khan Son of Irafan Khan interview  
मनोरंजन

Babil Khan : 'मी इरफान खानचा मुलगा त्यामुळे मला...', बाबीलनं स्पष्टच सांगितलं!

मी फार इगोस्टिक आहे असे म्हटले जाते बऱ्याचदा त्यावरुन मला ट्रोलही केले जाते.

युगंधर ताजणे

Babil Khan Son of Irafan Khan interview : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बाबील हा वेगळी ओळख निर्माण कऱण्याचा प्रयत्न करतो आहे. दरम्यान त्यानं एका मुलाखतीतून त्याच्याविषयी जे गैरसमज होत आहेत त्याविषयी मोकळेपणानं संवाद साधला आहे.

बाबीलनं अल्पावधीतच त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. ज्यांनी त्याचा क्वाला, द रेल्वे मॅन नावाच्या कलाकृती पाहिल्या असतील त्यांना त्याच्या अभिनयाची चुणूक दिसून येईल. अशा या अभिनेत्यानं त्याच्या वडिलांविषयीच्या काही आठवणीही त्या मुलाखतीतून सांगितल्या आहेत.

मी फार इगोस्टिक आहे असे म्हटले जाते बऱ्याचदा त्यावरुन मला ट्रोलही केले जाते. या आरोपावर बाबीलनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मी ज्या कुटूंबात जन्माला आलो त्यातून मला जी शिकवण मिळाली ती नेहमीच दुसऱ्यांशी आदरानं वागण्याची. माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांना माझ्याकडून आदरच मिळेल. माझा इगोचा कोणताही प्रॉब्लेम नाही.

मी कधीही असे म्हणालो नाही की मी एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटूंबातून आलो आहे. माझा जन्म झाला तेव्हा माझा बाबा हा टीव्ही आणि चित्रपटामध्ये काम करत होता. त्यानं खूप संघर्ष केला. आमच्याकडे पैसेही नव्हते. तो काळ खूपच कठीण होता. माझ्या घरातील वातावरण हे खूपच दिलखुलास प्रकारचे आहे. आम्हा सगळ्यांमध्ये खूपच मोकळ्या प्रकारचा संवाद आहे. असेही बाबीलनं यावेळी सांगितले.

ज्यांना मी खूपच अहंकारी वाटतो त्यांना मला सांगायचे आहे की, मला माझ्या बाबाची शिकवण आहे. कधीही कुणाचा अनादर करायचा नाही. सगळ्यांशी नम्रपणे वागायचे म्हणून. त्यामुळे माझ्याकडून कुणाचा अनादर होणार नाही ही काळजी मी नेहमीच घेत असतो. बाबीलनं स्पष्ट शब्दांत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT