Munmun Dutta Munmun Dutta
मनोरंजन

बबिता पुन्हा चर्चेत; तो व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सर्वांनाच माहिती आहे. ही मालिका पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील प्रत्येक कलाकारांचा वेगळा चाहता वर्ग आहे. कोणाची कोणाशीही तुलना करता येणार नाही. यातलीच बबिता म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता युवा वर्गामध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणारा चाहता वर्ग मोठा आहे. तिचा व्हिडिओ व्हायरल होत असून, यात तिने डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा आतापर्यंतचा सर्वांत जास्त काळ चालणारी मालिका आहे. वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या मालिकेमध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत, ज्यांच्या शैली वेगवेगळ्या आहेत. मालिकेतील जेठालाल आणि बबिता यांची सुंदर केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. जेठालाल बबिताला प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही.

बबिताचे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता लोकांना खूप आवडते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. आता तिची जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिला कोणत्या बॉलिवूड कलाकारांचे वेड आहे आणि कोणासोबत डेटवर जायचे आहे, हे सांगत आहे. तिच्यासोबत दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीही दिसत आहे.

तुम्ही कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत डेटवर जाल, असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता बबिताने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रणबीर कपूर आणि वरुण धवन नाव घेतले. मुनमुन सांगते की तिला तिघांसोबत डेटवर जायचे आहे. काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजे राज अनडकट हे डेट करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघे बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. दोघेही सेटवर खूप वेळ एकत्र घालवतात. यानंतर मुनमुन आणि राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि अशा बातम्या पसरवणाऱ्यांना फटकारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

FIFA World Cup 2026 full Schedule: ४८ संघ, ३९ दिवस अन् १०४ सामन्यांचा थरार रंगणार..! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या सर्वकाही

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

SCROLL FOR NEXT