munmun dutta munmun dutta
मनोरंजन

वाईट अनुभव शेअर करताना बबिता म्हणाली, त्याने माझ्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : इतक्याच बबिता म्हणजे अभिनेत्री मुनमुन दत्ता चांगलीच चर्चेत आहे. टप्पूसोबस असलेल्‍या अफेअरनंतर ती आणखीनच चर्चेचा विषय झाली आहे. मुनमुन दत्ता तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. मात्र, आता ती लैंगिक शोषणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुनमुनने २०१७ मध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेचा उल्लेख केला होता. तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये वेदनेचा उल्लेख केला होता.

काही वर्षांपूर्वी कलाविश्वात #MeToo बराच ट्रेंडमध्ये आला होता. आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची, विनयभंगाची विदारक कहाणी अनेक महिलांनी समाजापुढे आणली होती. लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माची अभिनेत्री मुनमून दत्ताने असाच एक अनुभव शेअर केला. अशा पोस्ट शेअर करणे आणि महिलांवरील लैंगिक छळाच्या जागतिक जनजागृतीमध्ये सहभागी होणे आणि या छळाचा सामना करणाऱ्या महिलांशी एकजूट दाखवणे, या समस्येचे मोठेपणा दर्शवते, असे बबिताने म्हटले.

मला चांगल्या माणसांची संख्या पाहून धक्का बसला आहे ज्यांनी त्यांचे #metoo अनुभव शेअर केले आहेत. हे तुमच्याच घरात, तुमचीच बहीण, मुलगी, आई, पत्नी किंवा अगदी तुमच्या मोलकरणीसोबत होत आहे. त्यांचा विश्वास मिळवा आणि त्यांना विचारा. त्यांची उत्तरे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांच्या कथा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, असेही तिने म्हटले आहे.

ट्युशन शिकवणाऱ्या शिक्षकाने माझ्या अंडरपँटमध्ये हात घातला होता. तो वर्गातल्या मुलींना ओरडण्यासाठी त्यांच्या ब्राची पट्टी ओढायचा आणि त्यांच्या छातीवर चापट मारायचा. त्या वयात हे सारं इतरांना सांगण्याची भीती वाटत असे, असेही तिने सांगितले. अशा गोष्टी आई-वडिलांसमोर कशी ठेवणार हे माहीत नसते. त्याबद्दल एक शब्दही सांगायला लाज वाटते, असेही तिने सांगितले.

मला स्वतःचा अभिमान वाटतो

या घृणास्पद भावना दूर व्हायला अनेक वर्षे लागली. #metoo चळवळीत सामील झालेली आणखी एक आवाज झाल्याने आनंदी आहे. आज माझ्यात एवढी हिंमत आली आहे की जो कोणी माझ्यावर दुरूनही काहीही करण्याचा प्रयत्न करतील त्यांना मी फाडून टाकेन. आज मला स्वतःचा अभिमान वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार ते सुरक्षा… Labour Law बदलांनी तुमची कमाई, सुट्टी, सुरक्षा… सगळं बदलणार! विषय पैशांचा, बातमी तुमच्या कामाची

Deepak Chahar in BB19: दीपक चाहरची या स्पेशल कारणामुळे बिग बॉसच्या घरात एंट्री, घरातल्या सदस्यांशी काय बोलला ? Video Viral

Latest Marathi News Live Update : माहिमधील शाही वाडी परिसरात आग, अग्नीशामकाच्या 4 गाड्या दाखल

Rahu Ketu Gochar 2025: 23 नोव्हेंबरपासून ‘या’ राशींवर राहू–केतूची कृपादृष्टी! करिअरमध्ये मिळेल नवी संधी

Solapur : सोनाराच्या बाथरूममध्ये चांदीची बादली, आयकर विभागाचा सराफ आणि बिल्डर्सवर छापा

SCROLL FOR NEXT