shreya ghoshal 
मनोरंजन

श्रेया घोषालने दिली 'गूड न्यूज'; लवकरच हलणार पाळणा

स्वाती वेमूल

आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका श्रेया घोषालने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे. श्रेयाच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये श्रेयाचा बेबी बंप सहज दिसून येत आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे, असं म्हणत श्रेयाने चाहत्यांना ही 'गूड न्यूज' सांगितली. श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्नगाठ बांधली होती. नवी दिल्लीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. श्रेया तिच्या खासगी आयुष्याविषयी फार व्यक्त होत नाही. त्यामुळे तिच्या लग्नाचे फोटोसुद्धा काही वर्षांनी समोर आले होते. त्यानंतर आता तिने चाहत्यांना गरोदर असल्याची माहिती दिली. 
 

'लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत, त्यासाठी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची फार गरज आहे', अशी पोस्ट लिहित श्रेयाने आनंद व्यक्त केला. श्रेयाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

दूरदर्शनवरील 'सा रे ग म प' या गायनस्पर्धेत श्रेयाने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'देवदास' या चित्रपटासाठी तिने पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच श्रेयाने संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. श्रेयाने हिंदीसोबत इतर भाषांमधीलही अनेक गाणी गायली आहेत. पार्श्वगायनासोबतच ती काही रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणूनही झळकली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT