Baby On Board marathi web series released on planet marathi  sakal
मनोरंजन

Baby On Board: गरोदरपणाची धमाल जर्नी.. 'बेबी ऑन बोर्ड'चा प्रवास सुरु..

श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर सुरू झाली आहे.

नीलेश अडसूळ

Baby On Board: 'बेबी ऑन बोर्ड'च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, 'बेबी ऑन बोर्ड' चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.

(Baby On Board marathi web series released on planet marathi )

'बेबी ऑन बोर्ड'च्या (baby on the board) पहिल्या दोन एपिसोड्समध्ये प्रतीक्षा मुणगेकर म्हणजेच श्रुती व अभिजीत आमकार म्हणजेच सिद्धार्थचा त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश पाहायला मिळत आहे. गृहप्रवेश करतानाचा या जोडप्याचा आनंद, उत्सुकता यात दिसतोय. श्रुतीचे बाळंतपण सिद्धार्थने करायचे ठरवल्यावर आता एक बाबा आणि नवरा म्हणून त्याची जबाबदारी तो कशी पार पाडतो, या दरम्यान या दोघांमध्ये होणारी नोकझोक यात अधिकच रंगत आणत आहे.

श्रुतीचे डोहाळे पुरवण्यापासून तिच्या प्रेग्नंन्सी डाएटपासून खाण्या - पिण्याच्या वेळेची काळजी सिद्धार्थ घेतोय. स्वतः चमचमीत, चाविष्ट पदार्थांचा त्याग करणारा, श्रुतीला मॉर्निंग वॉकला घेऊन जाणारा एक उत्तम नवरा आणि 'डॅड टू बी' सिद्धार्थ सर्वांनाच आवडेल. पहिल्या दोन एपिसोड्सने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची.

अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " बेबी ऑन बोर्डचे पहिले दोन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर आले असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. श्रुती व सिद्धार्थ या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. काही तरी नवीन मजेशीर आशय 'बेबी ऑन बोर्ड'च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत आणि प्रेक्षकांना आमचा हा प्रयोग आवडत असल्याचे बघून समाधान वाटतेय. लवकरच याचे पुढील भागही प्रेक्षकांच्या भेटीला येतील."

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सीरिजचे दिग्दर्शन सागर केसरकर यांनी केले आहे. निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT