Bade Miyan Chote Miyan esakal
मनोरंजन

Bade Miyan Chote Miyan: 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज; सोनाक्षी, अक्षय आणि टायगरचा जबरदस्त डान्स

Bade Miyan Chote Miyan: 'मस्त मलंग झूम' हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामध्ये सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), अक्षय आणि टायगर यांचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे.

priyanka kulkarni

Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगर यांचे अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आता नुकतेच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातील 'मस्त मलंग झूम' हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामध्ये सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), अक्षय आणि टायगर यांचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे.

'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज

'मस्त मलंग झूम' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षय कुमार आणि बॉलिवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांचे डान्स मूव्ह गाण्यात प्रेक्षकांना बघायला मिळतील. अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि निखिता गांधी यांनी हे गाणं गायल असून विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे तर इर्शाद कामिल यांनी गाणं लिहिल आहे.

पाहा गाणी

बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये 'मस्त मलंग झूम' हे गाणे चार चाँद लावून जाणार आहे. टायगर श्रॉफचा टायगर इफेक्ट या गाण्यातून दिसणार आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' कधी होणार रिलीज?

पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित, अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 9 एप्रिल 2024 रोजी रिलीज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT