Bade Miyan Chote Miyan 
मनोरंजन

Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा जबरदस्त डान्स; "बडे मियाँ छोटे मियाँ' चं टायटल ट्रॅक आऊट

"बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतच रिलीज झालं असून अक्षय आणि टायगर यांचा जबरदस्त डान्स या गाण्यात बघायला मिळत आहे.

priyanka kulkarni

Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडमधील ॲक्शन सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हे लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतच रिलीज झालं असून अक्षय आणि टायगर यांचा जबरदस्त डान्स या गाण्यात बघायला मिळत आहे.

प्रेक्षकांना थिरकायला लावणारे बीट्स असणाऱ्या या टायटल ट्रॅकची खासियत अक्षय आणि टायगर यांचा डान्स आहे.हे गाणं सोशल मीडियावर शेअर करुन अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "तेरे पीछे तेरा यार खड़ा". विशाल मिश्रा यांनी तयार केलेलं आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणं गायलं आहे. हे गीत इर्शाद कामिल यांनी लिहिलेले आहेत आणि बॉस्को-सीझर यांनी नृत्यदिग्दर्शित केले आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' ची स्टार कास्ट

पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित, बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यामुळे खिलाडी कुमार आणि बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' या रोमांचकारी राइडसाठी तयार व्हा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT