Hania Aamir's pics with Badshah are going viral  Esakal
मनोरंजन

Badshah: बादशाह बनणार पाकिस्तानचा जावई? 'या' अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव...

Vaishali Patil

Hania Aamir's pics with Badshah are going viral: बी-टाऊनचा प्रसिद्ध रॅपर बादशाह हा सध्या त्याच्या गाण्यांमुळे कमी तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर बादशाहच्या डेटिंगच्या चर्चा सुरु होत्या. अलीकडेच बादशाह मृणाल ठाकूरसोबत डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आला होता. मात्र बादशाहने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत या अफवा निराधार असल्याचे सांगितले.

मात्र आता पुन्हा बादशाहच्या डेटिंगच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र बादशाह हा भारतीय नाही तर परदेशी अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यात बादशाह पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत दिसत आहे. बादशाह सोबतचे हे फोटो हानियाने शेअर केले आहेत.

हानियाने हे फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, मुलं शॉपिंगला गेली होती. तर यासोबतच तिने एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. ज्यात ते मस्ती करताना दिसत आहे.

आता नेटकऱ्यांनी या फोटोंना कमेंट करायला सुरुवात केली आहे. एकानं लिहिलं आहे, जियान विथ शिझुका. तर एकानं लिहिले की, हानिया वेडी झाली आहे. तर या फोटोंमुळे दोघांच्या चर्चा सोशल मिडियावर रंगल्या आहेत.

काहीवेळा पुर्वी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दिवाळी पार्टीत बाहशाह मृणालसोबत दिसला होता. या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बादशाह मृणाल ठाकूरसोबत दिसत होता.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर बादशाहने या बातमीचे खंडण केले होते. आता बादशाह खरच हानियाला डेट करत आहे हे जाणुन घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT