मनोरंजन

Badshah: एकेकाळी होते 'जय-विरु' आता आहेत 'जानी दुश्मन'! बादशाहनं सांगितलं हनी सिंगसोबतच्या वादाचं कारण..

Vaishali Patil

Badshah Honey Singh Controversy: प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग आणि बादशाह यांच्यातील वाद हा तर सर्वश्रुत आहे. मात्र असा देखील एक काळ होता ज्यावेळी त्यांच्या मैत्रीने इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली. या दोघांनी मिळून 'माफिया मुंडिर' नावाचा बँड तयार केला. ज्याला लोकांनी खुप पसंतही केलं होतं. ‘खोल बोतल’, ‘बेगानी नार बुरी’, ‘दिल्ली के दीवाने’ असे हिट गाणे यांच्या जोडीने दिले जे आजही लोकप्रिय आहेत.

मात्र हनी आणि बादशाह यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडली आणि2012 मध्ये हा बँड फुटला. त्यानंतर दोघांमध्ये खुप वादही झाले. आता अनेक दिवसानंतर रॅपर बादशाहने हनी सिंग आणि त्याच्यातील भांडणाला हनी कसा जबाबदार होता हे सांगितलं आहे. एका पॉडकास्टमध्ये बादशाहने याबद्दल सांगितले.

बादशाह म्हणाला की हनी सिंग हा त्यावेळी खुप आत्मकेंद्रित आहे. जो फक्त त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत द्यायचा दुसऱ्याचे मतं त्याला पटायची नाही. त्यामुळे आमचा बँड तुटला. त्याच्या आधी थोडे वाद झाले होते.

त्यामुळे बादशाही आणि हनीने त्या काळात अनेक गाणी केली होती जी कधीच रिलीज होऊ शकली नाहीत.

बादशाह त्याला फोन करायचा मात्र तो हनी त्याचा फोन नाही उचलायचा. त्यानंतर त्याच्यातील दुरावे खुप वाढले. ते पुन्हा कधीच एकत्र येऊ शकलो नाही.

इतकच नाही तर बादशाहने सांगितले की, त्याने त्यावेळी हनीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही खूप गाणी रचली आहेत, तो आम्हाला भाऊ म्हणायचा आणि स्वत:चं करियर करण्यासाठी आमच्या स्टगलकडे दुर्लक्ष करायचा. त्याने आमच्याकडून कोऱ्या कागदावर सही करुन घेतली होती.

बाहशाहने हनी सिंगला स्वार्थी देखील म्हटलं आणि जर ते दोघ आज एकत्र असते तर परिस्थीती खुपच वेगळी असती असं देखील सांगितलं. 2011 मध्ये हनी सिंगसोबत त्याचे पहिले गाणे 'गेट अप जवानी' आले. लोकांनाही हे गाणे खूप आवडले आहे. मात्र वादानंतर दोघांची जोडी कधीच एकत्र आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...

Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस

Latest Marathi News Live Update : दलित असल्याचे सांगताच रुम नाकारली, वंचितच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

SCROLL FOR NEXT