Bageshwar Dhirendra Shahstri Place Natu Natu Hindi Singer  esakal
मनोरंजन

Bageshwar Shahstri : धीरेंद्र बाबाच्या भेटीला 'नाटू नाटू'चा गायक अन् 'गदर'ची अभिनेत्री!

आता बागेश्वर महाराजांच्या दर्शनाला मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी देखील उपस्थित राहत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bageshwar Dhirendra Shahstri Place Natu Natu Hindi Singer : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. कुणाच्याही मनातलं ओळखण्याची अनोखी सिद्धी या बाबांना अवगत असल्याची चर्चा आहे. त्यावरुन त्यांना अनेकांनी आव्हान देखील दिले आहे. देशभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र महाराज वेगवेगळ्या कारणांमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आता बागेश्वर महाराजांच्या दर्शनाला मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी देखील उपस्थित राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये ज्या चित्रपटाच्या गाण्याला ऑस्कर मिळाला त्या आरआऱआऱ च्या हिंदी गाण्याचे गायक विशाल मिश्रा आणि गदर २ फेमची अभिनेत्री सिमरन कौर यांचा समावेश आहे. यानंतर या दोन्ही सेलिब्रेटींवर सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव होत असल्याचे दिसून आले आहे. कुणाच्याही मनातील गोष्ट सहजपणे ओळखू शकणाऱ्या धीरेंद्र स्वामींना भेटण्यासाठी देशातून लाखो भाविक येत असतात.

Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड याठिकाणी त्यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दीही केली होती. याप्रसंगी मुंबईतील प्रसिद्ध सेलिब्रेटींनी त्यांची भेट घेतल्याचे दिसून आले.

अभिनेत्री सिमरन कौरनं तिच्या एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले होते. मी त्या बाबांना खूप मानते. त्यांच्यावर माझा खूप विश्वासही आहे. ते ज्याप्रकारे लोकांशी संवाद साधतात ते अजब आहे. मी त्यांची खूप मोठी भक्त असून आईसोबत त्यांचे दर्शन करण्यासाठी गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT