Saahil Chadha  
मनोरंजन

'बागबान'मधील अभिनेत्याचा अपघात; अ‍ॅम्ब्युलन्सने दिली धडक

अपघातात पत्नीदेखील जखमी

स्वाती वेमूल

'बागबान' Baghban, 'सेक्शन ३७५' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता साहिल चड्ढा Saahil Chadha याचा अपघात झाला. एका अॅम्ब्युलन्सची धडक लागल्याने साहिल आणि त्याची पत्नी प्रोमिला हे दोघं जखमी झाले आहेत. बुधवारी मुंबईत हा अपघात झाला. साहिल आणि प्रोमिला एका मिटींगमधून निघाले आणि पार्किंगमध्ये असलेल्या त्यांच्या कारकडे चालत जात होते. झेवियर्स कॉलेजच्या मागच्या गल्लीत त्यांची कार पार्क केली होती. त्यावेळी मागून एका अॅम्ब्युलन्सची त्यांना धडक लागली. या धडकेने साहिल दोन फूट अंतरावर फेकला गेला आणि त्याला पोटाला, पायाला जखम झाली. तर त्याच्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला. (Baghban actor Saahil Chadha suffers injuries after being hit by ambulance)

सध्या साहिलला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पत्नी प्रोमिला ही तिच्या बहिणीसोबत राहत आहे. पुढील दोन-तीन दिवसांत साहिलला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. "हा अपघात अत्यंत भीतीदायक आणि धक्कादायक होता. पोलिसांनी ड्राइव्हरला अटक केली आहे", अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

साहिलने 'बागबान' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. साहिलसोबतच अमन वर्मा, समीर सोनी आणि नसिर काझी यांनीदेखील मुलांच्या भूमिका साकारल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT