bagheera movie teaser starring Srii Murali prakash raj Dr Suri Prashanth Neel  SAKAL
मनोरंजन

Bagheera Teaser: 'कांतारा', 'सालार' पेक्षाही भयंकर असलेल्या 'बघीरा'चा टीझर, हा सुपरस्टार प्रमुख भूमिकेत

बघीराचा टीझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Bagheera Teaser News: सध्या 'सालार' सिनेमाची सगळीकडे उत्सुकता आहे. प्रभास या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. सालारची सध्या सगळीकडे क्रेझ आहे. प्रभासचे चाहते सालार पाहण्यासाठी आत्तापासूनच उत्सुक आहेत.

अशातच 'केजीएफ', 'कांतारा' आणि 'सालार'ला टक्कर द्यायला आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो म्हणजे 'बघीरा'. बघीराचा टीझर आज भेटीला आलाय.

होमबेल फिल्म्सने सालारच्या भव्य रिलीजपुर्वी बघीरा या आगामी रोमांचक सिनेमाच्या टीझरचे अनावरण केले आहे. या सिनेमात साऊथ सुपरस्टार श्री मुरली झळकणार आहे. आज मुरलीच्या वाढदिवसानिमित्त, होमबेल फिल्म्सने सोशल मीडियावर "बघीरा" चा 1 मिनिट 26 सेकंदाचा अॅक्शन-पॅक टीझर रिलीज केला. (Latest Marathi News)

बघीराच्या टीझरमध्ये आपल्याला एका अंधारमय जगाची झलक दिसते. एका शहरात मुलींवर आणि सामान्य नागरिकांवर अन्याय होत असलेला दिसतोय. यावेळी गुंडांपासून शहराला वाचवण्यासाठी एक तरुण बघीराचा कपडा लावून गुंडांशी सामना करण्यास सज्ज आहे. केजीएफ, सालारप्रमाणे बघीरा सुद्धा भव्य आणि रोमांचक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष गोष्ट म्हणजे, केजीएफ चाप्टर 1 आणि केजीएफ 2 चे लेखक - दिग्दर्शक प्रशांत नील यांनी 'बघीरा'चं लेखन केलंय.

बघीरा या आगामी सिनेमात श्रीमुरली, रुक्मिणी वसंत, प्रकाश राज, रंगायना रघू, अच्युत ठाकूर, गरुडा राम असे कलाकार झळकणार आहेत. या सिनेमाची रिलीज डेट अजुन समोर आली नाही. तरीही हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT