Nassar Father Mehboob Basha Died: Esakal
मनोरंजन

Nassar Father Mehboob Basha Died: बाहूबली फेम अभिनेत्याला पितृशोक! कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

साउथचे प्रसिद्ध अभिनेते नासरचे वडील महबूब बाशा यांचे निधन झाले आहे.

Vaishali Patil

Nassar Father Mehboob Basha Died: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. साउथचे प्रसिद्ध अभिनेते नासर यांचे वडील महबूब बाशा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मेहबूब बाशा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी चंगेलपेट येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

वडिलांच्या निधनाने अभिनेता नासर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. साउथ इंडस्ट्रीतील कलाकरांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहेत. बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी मेहबूब बाशा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अभिनेता नासर हे साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे, त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या नासर हे अ‍ॅक्टर्स युनियनचे अध्यक्ष आहेत. वृत्तानुसार, मेहबूब बाशा यांना सुरुवातीपासूनच मुलगा नासरला अभिनेता बनवायचे होता, ज्यासाठी त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला.

नासर यांचे वडील मेहबूब बाशा हे पूर्वी ज्वेलरी पॉलिशिंगचे काम करायचे. कष्टाने कमावलेल्या पैशाने त्यांनी नासरला अभिनय शाळेत प्रवेश मिळवून दिला. नासर यांनीही वडिलांची इच्छा पूर्ण करत फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि तमिळनाडू इन्स्टिट्यूट फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

मात्र घरची परिस्थीती बिकट असल्याने त्यांनी अभिनयातुन ब्रेक घेत चेन्नईतील एका हॉटेलमध्येही काम केले. आता नासर ते साउथमधील प्रसिद्ध अभिनेते बनले आहे. नासर यांच्या वडीलांच्या निधनाची बातमी कळताच, चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT