Baiju Paravoor Malayalam Director Dies Of Suspected Food Poisoning In Kochi  SAKAL
मनोरंजन

Baiju Paravoor Death: प्रसिद्ध दिग्दर्शकाचे दुर्दैवी निधन, हॉटेलमध्ये जेवणाचं निमित्त ठरलं

४२ वर्षीय दिग्दर्शकाच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय

Devendra Jadhav

Baiju Paravoor Death News: मल्याळम चित्रपट दिग्दर्शक आणि बैजू परावूर यांचं निधन झालंय. ४२ वर्षीय दिग्दर्शकाच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. अन्नातून विषबाधा झाल्याने दिग्दर्शक बैजू यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

बैजू यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बैजू यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बैजू काही चित्रपटाच्या कामानिमित्त कोझिकोडमध्ये होते. शनिवारी कारने घरी परतत असताना एका हॉटेलजवळ त्यांनी थांबून जेवण केले. पण हेच निमित्त ठरलं आणि बैजू यांना जीव गमवावा लागला.

(Baiju Paravoor Malayalam Director Dies Of Suspected Food Poisoning In Kochi)

समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, त्यांची तब्येत बिघडल्याने दिग्दर्शकाने कुन्नमकुलम येथील त्यांच्या पत्नीच्या घरी म्हणजेच सासरी जाण्याचा निर्णय घेतला आणि सासरच्या ठिकाणी पोहोचताच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली.

त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांचा त्रास तिथेच संपला नाही आणि ते रविवारी परावुर येथील त्यांच्या घरी परतले.

घरी परतल्यांनंतरही बैजूच्या तब्येतीत काहीच सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर कुझुपिल्ली येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. आणि त्यांना तातडीने कोची येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली.

अखेर उपचारादरम्यान त्यांची जीवनाशी झुंज अपयशी ठरली. आणि अखेर सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रा आणि त्यांची मुले आराध्या आणि आरव असा परिवार आहे.

सोमवारी संध्याकाळीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वृत्त आहे. बैजु यांच्या निधनाने मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT