baipan bhaari deva fame actress shilpa navalkar daughter graduate SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा मधील केतकीची मुलगी झाली ग्रॅज्युएट, आई झाली खुश

बाईपण भारी देवा सिनेमात केतकीची भुमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्या आयुष्यात गुड न्युज दिलीय.

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva Shilpa Nawalkar News: बाईपण भारी देवा सिनेमा महिलांपासुन पुरुषांपर्यंत सर्वांना आवडला. सर्वजण या सिनेमाचे फॅन्स झाले आहेत. बाईपण भारी देवा सिनेमातील अभिनेत्रींनी सिनेमात अक्षरशः धुमाकुळ घातलाय.

अशातच बाईपण भारी देवा सिनेमात केतकीची भुमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्या आयुष्यात गुड न्युज दिलीय.

(Shilpa Navalkar daughter graduate)

शिल्पा नवलकरची मुलगी झाली ग्रॅज्युएट

शिल्पा नवलकर यांनी बाईपण भारी देवा सिनेमात केतकीची भुमिका साकारली आहे. शिल्पा यांची मुलगी ग्रॅज्युएट झाली आहे. शिल्पा नवलकर यांनी सोशल मिडीयावर मुलगी ग्रॅज्युएट झाल्याचे फोटो पोस्ट केलेत.

मुलीच्या पदवीदान समारंभात शिल्पा त्यांच्या नवऱ्यासोबत सहभागी झाल्या होत्या. जेव्हा तुमची मुलगी ग्रॅज्युएट होते तेव्हा.. असं कॅप्शन देत शिल्पा नवलकर यांनी मुलीचं अभिनंदन केलंय. शिल्पा यांच्या मुलीचं नाव कुहू असुन सर्वांनी तिचं अभिनंदन केलं.

बाईपण भारी देवा १०० कोटी पार

बाईपण भारी देवा या चित्रपटाला फुल टू माउथ पब्लिसीटी मिळत आहे. त्यातच चित्रपटाची कथा, त्याला घातलेली भावनिक साद आणि चित्रपटातील कमाल गाणी यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. याचाच फायदा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर महिलांची गाडी सुसाट निघाली आहे. या गाडीने 50 कोटींचा स्टेशन गाठलं आहे. आता ही गाडी 100 कोटींच्या स्टेशनकडे वळाली आहे.

प्रेक्षकांच्या प्रेमाचा हा स्पिड असाच कायम असला तर बाईपण भारी देवा ची गाडी लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी शंका नाकारता येत नाही.

बाईपण भारी देवा रेकॉर्डब्रेक

३० जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या चित्रपटात सहा अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकली. त्यांच्या अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

फक्त 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट अनेक रेकॉर्ड करत आहे. आतापर्यंत चित्रपटाने पन्नास कोटींचा आकडा पार केला. अशाप्रकारे तो २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT