baipan bhaari deva marathi movie sequel coming soon directed by kedar shinde  SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवाच्या सिक्वेलची तयारी? केदार शिंदेच्या त्या फोटोने चर्चांना उधाण

Baipan Bhaari Deva sequel: बाईपण भारी देवाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु झालीय.

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva 2 News: बाईपण भारी देवा सिनेमा सध्या सगळीकडे चांगलाच गाजतोय. बाईपण भारी देवा पाहायला अनेकांनी गर्दी केली.

महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही सिनेमा पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली. हैद्राबादमध्ये सुद्धा महिलांनी बाईपण भारी देवा पहायला थिएटर हाऊसफुल्ल केलं.

बाईपण भारी देवा ला प्रेक्षकांनी डोक्यावर केलं. अशातच बाईपण भारी देवाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु झालीय.

(Baipan Bhaari Deva marathi movie sequel coming soon directed by kedar shinde)

बाईपण भारी देवा चा सिक्वेल येणार?

बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये बाईपण भारी देवा ची कथाकार वैशाली नाईक बाईपण.. साठी काम केलेला लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त पहायला मिळत आहेत.

"एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी.." असं कॅप्शन दिलंय. या फोटोला चाहत्यांनी पसंती दिलीय.

बाईपण भारी देवा सिनेमाच्या या टीमला पाहून अनेकांना सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झालीय, अशा चर्चा सुरु झाल्यात. बाईपण भारी देवा सिनेमाच

बाईपण भारी देवाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट

बाईपण भारी देवा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. यावरुन दिसतं की... ३० दिवसात बाईपण भारी देवा सिनेमाने ७० कोटीहून जास्त कमाई केलीय.

हॉलीवूड - बॉलीवूडच्या गर्दीतला मऱ्हाठमोळा आकडा, असं कॅप्शन देत ही आनंदाची बातमी बाईपण भारी देवा सिनेमाच्या टीमने शेअर केलीय.

बाईपण भारी देवा यशस्वी कामगिरी पाहून दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात..

केदार शिंदे बाईपण भारी देवाच्या रेकॉर्डब्रेक कामगिरी बद्दल म्हणतात.. "आपण न मागता परमेश्वर भरभरून देतो.. तो नेमका कोणत्या रूपात प्रकट होतो? ते कधीच कळत नाही. यावेळी मात्र त्याचं रूप पाहिलं.. रसिक प्रेक्षकांच्या रूपातच परमेश्वर प्रत्येक चित्रपट गृहात अवतरला.

आणि पदरात दान टाकून गेला.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाहीच, याची खात्री आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सिध्दीविनायक महाराज की जय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT