Baloch marathi movie Trailer out cast pravin tarde smita gondkar release date 5 may sakal
मनोरंजन

Baloch Trailer: तर.. येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील की, इथं मराठ्यांच्या औलादी येऊन गेल्यात.. 'बलोच'चा दमदार ट्रेलर!

अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर बघाच..

नीलेश अडसूळ

Baloch Trailer: बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले?

बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित 'बलोच' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

(Baloch marathi movie Trailer out cast pravin tarde smita gondkar release date 5 may)

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर या चित्रपटातील 'खुळ्या जिवाला आस खुळी' हे पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. यावरून या चित्रपटात एका मराठ्याचे निरागस प्रेम तर दुसरीकडे बलुचिस्तानचे रोमांचकारी युद्ध अनुभवायला मिळणार आहे. ‘बलोच’चा टिझर अंगावर शहारे आणणारा आहे.

चित्रपटातील दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एका मराठी लढवय्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही कहाणी आहे. गुलामगिरी पत्करूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा विजय म्हणजे ‘बलोच’.

चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाची भव्यता कळतेय. अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत.

प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, रमेश परदेशी, अमोल कागणे, सुरभी भोसले यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या असून हा चित्रपट येत्या ५ मे रोजी 'बलोच' प्रदर्शित होणार आहे. ‘बलोच’च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाविषयी दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, "पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या पदरी घोर निराशा पडली. कधी हार न स्वीकारणारे मराठे गुलामगिरीला मुकले. परक्यांचा अन्याय, अत्याचार सहन करत प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता समर्पण देणाऱ्या हरहुन्नरी वीरांची शौर्यगाथा 'बलोच' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.''

''ही पराभवाची कहाणी नसून मराठ्यांच्या विजयगाथेची कहाणीआहे. अतिशय शानदार पद्धतीने या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, खूपच आनंद आहे या गोष्टीचा. प्रत्येक कलाकार उत्कृष्ट आहे आणि त्यांचा दमदार अभिनय पडद्यावर दिसेलच. या चित्रपटातील लढवय्या मराठ्यासाठी प्रवीण तरडे यांच्या शिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT