Pathaan controversy
Pathaan controversy 
मनोरंजन

Pathaan controversy : ...अन्यथा चित्रपटगृह पेटवून द्या; महंतांचा थेट इशारा, शाहरूख...

सकाळ डिजिटल टीम

अयोध्या : अभिनेता शाहरुख खान यांचा बहुचर्चित पठाण चित्रपटाचे बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले आहे. मात्र या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीमुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्याविरुद्ध आता सर्वोच्च न्यायालयाचे वकील थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालायाकडे धाव घेतली आहे. तर अयोध्येतील महतांनी थेट सिनेमागृह पेटविण्याच धमकी दिली आहे. त्यामुळे शाहरुखच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Pathaan controversy news in Marathi)

वकील विनीत जिंदाल यांनी गुरुवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले. दुसरीकडे, अयोध्येचे हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जनतेला केले. "मी लोकांना आवाहन करतो की, ज्या चित्रपटगृहांमध्ये पठाण दाखवला जाईल, अशा चित्रपटगृहांना आग लावावी," असे महंत यांनी एका व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे, लाईव्हहिंदुस्तानने याबाबत वृत्त दिलं आहे.

आपल्या तक्रारीत वकिल जिंदाल यांनी म्हटलं की, बेशरम रंग' हे गाणं अश्लील आहे. यामध्ये दीपिका पदुकोण भगवी बिकिनी परिधान करताना दिसून येत आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. भगवा हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु बॉलिवूड या गाण्यात अश्लील चाळे करून अभिमान आणि भक्तीच्या रंगाचा अपमान करत असल्याचंही जिंदाल यांनी नमूद केलं.

अयोध्याचे महंत राजू दास यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं की, हे गाणं भावना दुखावणारे आहे. शाहरुख खानने हिंदू धर्माचा अनेकदा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "बॉलिवूड आणि हॉलिवूड नेहमीच सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात. दीपिका पदुकोनने ज्या पद्धतीने भगव्या बिकिनीचा वापर केला आहे, ते अत्यंत निंदणीय आहे. मी लोकांना या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो. ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जाईल ती चित्रपटगृहे जाळून टाका कारण अन्यथा त्यांना समजणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT