Barsu Refinery Project Local Farmer Protest Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Got Trolled For Support To Refineries Viral Poster  Esakal
मनोरंजन

Barsu Refinery: 'सुंदर कोकण दाखवून पैसे कमावले अन् रिफायनरीला','कोकण हार्टेड गर्ल' झाली ट्रोल..

Vaishali Patil

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक चढउतार दिसत आहे. अनेक नाट्यमय घडामोडीही सुरु आहेत. सत्तापालट त्यानंतर नवीन सत्तांतर अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर जाणे आणि महाराष्ट्रातील कोकणातील प्रोजेक्टला आता जोरदार विरोध होणे.

बारसू रिफायनरीबाबत महाराष्ट्रातील राजकिय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. बारसू गावच्या जागेवरही स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे.

या प्रकल्पामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. त्यांची फळझाडे नष्ट होतील, रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होईल, त्याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होणार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आता त्यातच सोशल मिडियावरही या रिफायनरीची चर्चा रंगली आहे. अनेक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर यांनी देखील व्हिडिओच्या माध्यमातुन कोकणकरांच म्हणणं मांडलय तर काहींनी याचे फायदे सांगतिले आहे.

अशातच मालवणी व्हिडिओ बनवणारी 'कोकण हार्टेड गर्ल' ही देखील या प्रकरणामुळे ट्रोल होतांना दिसत आहे.

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर ही सोशल मिडियावरील खुपच लोकप्रिय चेहरा आहे. ती तिचे व्हिडिओ मालवणी भाषेत बनवते.

ती तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अंकिता कोकणातील फूड आणि टुरिझमवर कोकणी भाषेतच व्हिडिओ बनवते.

तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर तिचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मात्र तिने रिफायनरीच्या ज्वलंत मुद्यावर काही भाष्य केलेल नाही. त्यामुळे आता तिला ट्रोल करण्यात येत होतं. 'ताई कोकण भडकलयं आता कधी बोलणार' असा सवालही नेटकरी तिला करत आहेत. त्यानंतर अंकिताने तिच्या युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओत तिने मुंबईच्या रिफायनरीचा आढावा घेतला आणि तिच्या व्हिडिओमध्ये या रिफायनरी कशा काम करतात याबद्दल सविस्तर माहितीही दिली.

काहींना तिचं मत पटलं तर काहींनी तिला खुप ट्रोल केल आहे. त्यातच आता एक पोस्टर सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाल आहे. ज्यात अप्रत्यक्षपणे कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर हिच्यावर टिका केली आहे.

हा फोटो पोस्टर बॉयने त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात त्याने लिहिलयं की, "ताईने सुंदर कोकण दाखवून आणि मालवणी भाषा बोलून यूट्यूब वर पैसे कमावले.... आणि आता ताई कोकणात रिफायनरी ला समर्थन देतेय... असं कसं चालेल ताई ?"

हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा सोशल मिडियावर रिफायनरीच्या मुद्यावर नवे वाद विवाद सुरु झाले आहेत.

अनेक राजकिय नेत्यांनीही याचा विरोध करत ग्रामस्थांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी या प्रकल्पाला पाठिंबा देत रिफायनरीमुळे रोजगार निर्मीती होईल आणि विकासाच्या अनेक वाटाही खुल्या होतील असं त्याचं मतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

SCROLL FOR NEXT