Battalion 60 marathi movie poster out starring ganesh shinde SAKAL
मनोरंजन

Battalion 60: बॉर्डरवर लढणारा महाराष्ट्राच्या मातीतला शूरवीर, बटालियन ६० नव्या सिनेमाची घोषणा

बॉर्डरवर हातात बंदूक घेऊन सैनिक दिसत आहेत, यावरून चित्रपटात एका शूर सैनिकांची गाथा पाहायला मिळणार असल्याचं कळतंय

Devendra Jadhav

Battalion 60 marathi movie News: आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास लाभला आहे. आपल्या मातीतल्या वीर पुत्रांनी या इतिहासाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे, याचे अनेक धडे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत.

हे वीर महाराष्ट्राच्या मातीतून कसे घडतात, त्यांचा तो प्रवास जाणून घेण्यासाठी लवकर रुपेरी पडदा गाजवायला एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

(Battalion 60 marathi movie poster out starring ganesh shinde)

'किंग प्रोडक्शन' आणि आणि तुषार कापरे पाटील प्रस्तुत हा चित्रपट असून दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित 'बटालियन ६०' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

मराठमोळ्या मातीत तयार झालेल्या एका शूर वीर नायकाची कथा या चित्रपट मांडण्यात येणार आहे. शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडत जातात याचं हुबेहूब वर्णन या चित्रपटात करण्यात आलं आहे.

नुकताच या चित्रपटाच पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरा वीर पाहायला मिळतोय, तसेच बॉर्डरवर हातात बंदूक घेऊन सैनिक दिसत आहेत,

यावरून चित्रपटात एका शूर सैनिकांची गाथा पाहायला मिळणार असल्याचं कळतंय, पाठमोरी असलेली व्यक्ती म्हणजे 'बलोच' फेम अभिनेता गणेश शिंदे आहे

अद्याप चित्रपटातील इतर कलाकार गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून लवकरच चित्रपटातील इतर कलाकारांची नाव समोर येणार आहेत.

या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी सांभाळली आहे. तर 'किंग प्रोडक्शन' आणि तुषार कापरे पाटील यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे.

'बटालियन ६०' हा चित्रपट एका शूर सैनिकाची कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. देशप्रेमींसाठी हा चित्रपट एक पर्वणीच असेल यांत शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT