Vijay Thalapathy  esakal
मनोरंजन

Thalapathy Vijay: तब्बल दहा वर्षानंतर दिली मुलाखत, केले मोठे खुलासे

तमिळ अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखर याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Tollywood Movies: तमिळ अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखर याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या (Social nedia viral news) त्याच्या बिस्ट (Beast Movie News) नावाच्या चित्रपटाची क्रेझ आहे. तो उद्या प्रदर्शित होतो आहे. त्याला आणखी टॉलीवूडच्या यशच्या केजीएफ 2 ची टक्कर (KGF 2 Movie) आहे. त्यामुळे येत्या दिवसांत कोणाची सरशी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून थलापती विजयनं कुणालाही मुलाखत दिलेली नाही. त्यानं जाणीवपूर्वक माध्यमांशी बोलणं टाळलं आहे. यामागील कारणही गुलदस्त्यात आहे. त्याला माध्यमांशी बोलायला फारसं आवडत नाही. अनेकदा विषय सोडून इतर प्रश्न विचारल्यानं आपला विरस झाल्याचे विजयनं सांगितलं आहे. त्यानं आता दिलेल्या मुलाखतीतून अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. (Thalapathy Vijay First interview in 10 years)

विजयनं त्याचा शेवटचा इंटरव्हयु दिला होता त्यामुळे त्याला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं होतं. त्याच्यावर टीकाही झाली होती. बिस्टच्या निमित्तानं विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानं आपले चित्रपट, सध्याची राजकीय परिस्थिती यावर कडाडून भाष्य केले आहे. बिस्टचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांनी विजयची मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये त्याला त्यानं पहिलाच प्रश्न असा विचारला आहे की, गेल्या दहा वर्षांपासुन त्यानं मुलाखत का दिली नाही, त्यावर विजय म्हणतो, मी काही फार मोठा सेलिब्रेटी नाही. मी फार बिझीही नाही. मात्र दहा वर्षांपूर्वी एक मोठी घटना घडली होती. त्यामुळे माझ्यावर मोठी टीकाही झाली होती. त्यामुळे मी असे ठरवले की, आपण जे काही बोलतो ते बोलण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे, सध्याच्या सोशल मीडियाच्या दुनियेत लोकं तुमच्या बोलण्याचा काहीही अर्थ काढून रिकामे होतात. एखाद्या सेलिब्रेटीच्या आयुष्याचा प्रश्न असतो तेव्हापासून मी अधिक सावध झालो.

त्या मुलाखतीमध्ये मी जे काही बोललो त्यापेक्षा वेगळं असं काही छापण्यात आणि दाखवण्यात आले होते. त्यामु्ळे मी संतापलो. आणि यापुढे कोणत्याही मीडियाशी काही बोलायचं नाही असे ठरवून टाकले. मी सध्याच्या परिस्थितीबाबत फारसा गांभीर्यानं विचार करत नाही. माझ्यापेक्षा लोकांना काय वाटते हे अधिक महत्वाचे आहे. मी आता कोणत्याही गोष्टीचा स्वताला त्रास करुन घेत नाही. माझ्या घरात माझी आई आणि वडिल वेगवेगळ्या धर्माचे आहेत. मी आता माझ्या मुलांना सर्वधर्म समभावाची शिकवण दिली आहे. आपण चांगले तर जग चांगलं हे माझं त्यांना सांगणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT