Rupa Dutta Google
मनोरंजन

छोट्या पडद्यावरची 'मॉं.वैष्णोदेवी' रुपा दत्ताला पाकिटचोरी प्रकरणात अटक

कलकत्ता येथे अटक झालेल्या अभिनेत्री रुपा दत्ताकडे ६५,७०० रुपये रोख रक्कम आणि बॅग्ज सापडल्यात.

प्रणाली मोरे

प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता(Rupa Dutta) हिला पाकिट मारल्याच्या आरोपाखाली कोलकाता इथं अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिनं दिलेल्या कबुली जबाबात काही धक्कादायक खुलासे देखील झाले आहेत. रुपा दत्ता हिला आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात पाकिट मारल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. रुपा ही हिंदी मालिका तसंच बंगाली सिनेमातही आपल्या अभिनयामुळं ओळखली जाते. पोलिसांनी तिला पुस्तक मेळाव्यात अटक केल्यानंतर तिच्याकडून तब्बल ६५,७०० इतकी रक्कम जप्त केली आहे. काही महागड्या बॅग्जही तिच्याकडून जप्त केल्या गेल्या आहेत. इतकी रक्कम तिच्याकडे कुठून आली यावर रुपानं अद्याप स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.

पण तपासात तिनं कबूल केलं आहे की,''पाकीट मारायची तिची ही पहिलीच वेळ नसून याआधीही तिनं पाकिट चोरी अनेकदा केलेली आहे''. पोलिसांनी माहिती दिली आहे की,त्या मेळाव्यातनं काही बॅग्ज गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती. काही पोलिस तिथे गस्त देऊन होते तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की रुपा काही बॅग्ज या कचऱ्याच्या डब्यात फेकत आहे. तिला विचारल्यावर ती म्हणाली की,''मी या बॅग्ज कचऱ्याच्या डब्यात फेकत आहे कारण मला त्या नको आहेत''. जेव्हा पोलिसांनी त्या बॅग्ज चेक केल्या तेव्हा त्यात आय.डी कार्ड सापडले आणि इतरही काही दस्ताऐवज सापडला. तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवलेल्या व्यक्तिला तिथे बोलावले,तेव्हा त्या माणसानं बॅग्ज आपल्या आहेत असं म्हटलं. त्या बॅग्जमध्ये तब्बल ६५,७०० रुपये पोलिसांना सापडले. तेव्हा रुपा लगेच गयावया करत रडू लागली आणि म्हणाली,''माझी आई दोन महिन्यांपूर्वी हे जग सोडून निघून गेलीय. तिनं मला दिलेल्या शापामुळे माझ्याकडून नकळतं हे अपकृत्य घडत आहे''. अशी कहाणी रचून सांगू लागली.

रुपाला क्लेप्टोमानिया(kleptomania) आजार झाल्याचा तात्पुरता अंदाज लावला गेला असून तिला पोलिस कस्टडीत न ठेवताव न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. रुपाच्या वकीलांनी दावा केला आहे की,''माझ्या अशिलाच्या(रुपाच्या) हातातून कोल्ड्रिंक कचऱ्याच्या डब्ब्यात चुकून पडलं तेव्हा ते काढायला गेली असताना तिला त्या बॅग्ज दिसल्या. तेव्हा फक्त कुतूहल म्हणून तिनं त्या पाहायल्या हातात घेतल्या होत्या. आणि तेव्हाच पोलिसांनी चौकशी न करता तिला ताब्यात घेतलं''. यावरनं कोर्टानं पोलिसांकडून स्पष्टिकरण मागितलं आहे आणि तोपर्यंत रुपाला न्यायालयीन कोठडीत ठेवायचे आदेश दिले आहेत. रुपा दत्ता 'जय मॉं वैष्णोदेवी' आणि बंगाली सिनेमा 'कोंकल' यातील तिच्या व्यक्तीरेखांमुळे अधिक ओळखली जाते. तिनं काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक अनुऱाग कश्यपवरही लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT