Bhagirathi Missing Release Date Cast Trailer and More Sakal
मनोरंजन

Bhagirathi Missing : ‘भागीरथी मिसिंग’ लवकरच होणार प्रदर्शित

मराठीमध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत संवेदनशील विषय ‘भागीरथी मिसिंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मराठीमध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत संवेदनशील विषय ‘भागीरथी मिसिंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

सस्पेन्स थ्रीलर असलेला हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सह्याद्री मोशन पिक्चर्स’ निर्मित, प्रमोद कुलकर्णी प्रस्तुत आणि सचिन वाघ दिग्दर्शित ‘भागीरथी मिसिंग’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. निर्माता-दिग्दर्शक सचिन वाघ म्हणाले की, प्रेक्षक चित्रपटगृहात येतात ते करमणुकीसाठी.

त्यामुळे चित्रपट तयार करताना करमणुकीला प्राधान्य दिले गेले आहे. बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेताना तिचे पूर्व आयुष्य उलगडत जाते. हा प्रवास संगीतमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सध्या एकूणच महिलांवरील अत्याचार आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

त्यामुळे आम्ही करमणुकीसोबतच हा विषयसुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे शीर्षक ‘भागीरथी मिसिंग’ या नावामुळे या प्रश्नाच्या गांभीर्याविषयी जर लोकजागृती झाली तर मला नक्कीच आनंद वाटेल. या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मुळगुंदकर, संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: भिवंडी घटनेत जीव वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्यांनी घेतला बळी, ठाण्यात मृत्यू

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला! दरवाजे 4 फुटांवर, कोयना नदीत 24 हजार 908 क्युसेक पाणी; कराडसह कृष्णाकाठ सतर्क

Chopdai Devi Yatra : जोतिबा भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! डोंगरावर 'या' दिवशी आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा; प्रशासनाकडून तयारी सुरू

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर यांची भक्कम आघाडी; 3 पैकी 2 जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता

Friend Bonding Numerology: 'या' ३ जन्मतारखांचे लोक बनतात बेस्ट फ्रेंड! भांडण झाले तरी तुटत नाही मैत्रीचे नाते...

SCROLL FOR NEXT