Akash Choudhary Esakal
मनोरंजन

Akash Choudhary: अभिनेत्यासोबत आधी फोटो काढला अन् नंतर हल्ला केला... व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Akash Choudhary: 'भाग्यलक्ष्मी' फेम प्रसिद्ध मॉडेल आणि लोकप्रिय अभिनेता आकाश चौधरी हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता देखील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका चाहत्याने आकाशसोबत फोटो क्लिक केला. त्यानंतर आकाश त्याच्या गाडीकडे जात असतांना त्याला मागून बाटली मारुन फेकली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडिओत दिसतयं की, आकाशचे काही चाहते त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी येतात, फोटो काढल्यानंतर त्यांच्यातील एक मुलगा आकाशला बाटली फेकून मारतो. त्या मुलाने आकाशला इजा पोहचवण्याचा दोन-तीन वेळा प्रयत्न केला. चाहत्याच्या या कृतीने आकाशला दुखापत झाली नसली तरी तो मात्र चांगलाच संतापला.

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी खुप संतापले आहेत. त्यांनी आकाशला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्या मुलाविरोधात तक्रार नोंदवण्याचा सल्ला त्याला दिला आहे.

काही दिवसांपुर्वी आकाशच्या गाडीचाही अपघात झाला होता. तो त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत प्रवास करत असताना त्याच्या कारचा अपघात झाला होता. मात्र यात कुणालाही दुखापत झाली नव्हती.

2016 मध्ये मिस्टर इंडिया वर्ल्डवाइडचा खिताब जिंकणारा आकाश चौधरी लोकप्रिय टीव्ही गेम शो 'Splitsvilla 10' मध्ये दिसला होता. या शोमधून त्याला खुप लोकप्रियता मिळाली. आकाश सोशल मीडियावरही खुप सक्रिय असतो. त्याच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT