Bhagyashree’s husband Himalaya undergoes ‘major’ shoulder surgery; shares an update  sakal
मनोरंजन

Bhagyashree: पतीवरील गंभीर शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्री भाग्यश्रीची पोस्ट, म्हणाली..

भाग्यश्रीने पती हिमालय दसानी यांच्यावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेची माहिती एका पोस्टमधून सांगितली आहे.

नीलेश अडसूळ

Bhagyashree Husband Surgery: लाईमलाइट पासून दूर असलेली आणि क्वचितच मीडियासमोर येणार अभिनेत्री भाग्यश्री आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या पतीवर म्हणजेच, हिमालय दसानी यांच्यावर एक गंभीर शस्त्रक्रिया पार पडली. त्याबाबत भाग्यश्रीने एक पोस्ट करत माहिती दिली आहे.

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'मैने प्यार किया (Maine Pyar Kiya) या चित्रपटातून रसिकांच्या काळजात अधिराज्य केलेली अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून भाग्यश्रीनं तिच्या पतीवर म्हणजेच हिमालय दसानी (Himalaya Dasani) यांच्यावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेबाबत सांगितलं आहे.

भाग्यश्रीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिमालय दसानी हे हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही कळत आहे. तसेच डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेताना दिसत आहे. व्हिडीओला भाग्यश्रीनं कॅप्शन दिलं आहे की, 'हिमालय यांची उजव्या खांद्याची मोठी सर्जरी झाली आहे. ही सर्जरी जळपास चार तास सुरु होती. त्यांची सर्जरी व्यवस्थित पार पडली आहे. आम्हाला सांगण्यात आले की ते एका दिवसात बरे होतील. पण आम्हाला त्यावर अजिबातच विश्वास बसला नाही, पण डॉ. गौतम तवारी आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानते. त्यांच्यामुळे ही शक्य झाले.'

भाग्यश्रीच्या पोस्टवर आता सर्वांच्या भरभरून कमेंट येत आहेत. सर्वजण तिचे सांत्वन करत आहेत. अंकिता लोखंडे, अर्चना पूरन सिंह, शक्ति कपूर, संजय कपूर या कलाकारांनी देखील भाग्यश्रीच्या पोस्टला 'गेट वेल सून' अशी कमेंट केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT