bharat 
मनोरंजन

'आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही', भरत जाधवचं मदतीचं आवाहन

राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा

स्वाती वेमूल

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही गावं पाण्याखाली गेली आहेत. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून जीवित व वित्तहानी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत रत्नागिरी, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरड कोसळलेल्या आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत अभिनेता भरत जाधवने शक्य होईल त्या मार्गाने कोकणात मदत पाठवण्याचं आवाहन केलं आहे.

'आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,' असं लिहित त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा किट, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतरवस्त्रे, अंथरुण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती यावर दिलेली आहे. सोबतच संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहेत.

पावसामुळे राज्यातील रायगड जिल्ह्यात हाहा:कार माजला असून तळई गावांत तब्बल ३६ जणांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. रायगडच्या महाडमध्ये आणि कोकणच्या चिपळूणमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक जण आपापल्या घरात अडकले आहेत. 'पुरात आणि भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, इतर काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्यास तेथील रहिवाशांना वेळीच स्थलांतरित करावे असेही निर्देश दिले आहेत', अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: पणन विभागाचीच माझ्याकडे अर्धी गर्दी - कृषिमंत्री भरणे मामा

SCROLL FOR NEXT